देशाचे संविधान व एकात्मता अबाधित राखण्यासाठी काँग्रेसचा लढा! : नाना पटोले

काँग्रेस पक्षासाठी संविधान व देशाची एकात्मता सर्वोच्च असून ती अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करत आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

देशाचे संविधान व एकात्मता अबाधित राखण्यासाठी काँग्रेसचा लढा! : नाना पटोले
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 8:33 PM

मुंबई : स्वातंत्र्यपूर्वी व स्वातंत्र्यानंतरही काँग्रेस पक्षाने देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काँग्रेसच्या सरकारने नियोजनपूर्वक आखणी करुन विकासकामे राबवली, त्यातूनच पायाभूत सुविधा निर्माण झाल्या, शिक्षण, रस्ते, पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था उभी राहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आणि काँग्रेस विचाराने देशातील एकात्मता कायम ठेवली गेली, परंतु मागील 7 वर्षापासून ही सर्व व्यवस्थाच मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. काँग्रेस पक्षासाठी संविधान व देशाची एकात्मता सर्वोच्च असून ती अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष करत आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. (Congress fights to keep constitution and unity of the country : Nana Patole)

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियानाअंतर्गत नाना पटोले औरंगाबादमधील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पटोले म्हणाले की, ज्या लोकांचा देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत सहभाग नव्हता तेच लोक धर्माच्या नावावर देश तोडण्याची भाषा करत आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविदांने नांदत असताना धर्माच्या नावावर राजकारण करुन तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. 14 ऑगस्ट हा दिवस स्मृती दिवस म्हणून साजरा करण्याचा भाजपाचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला. ज्या दिवशी देशात रक्तपात झाला त्या दिवसाच्या स्मृती कशाला जागृत करता? देशात मागील 7 वर्षांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. सरकारच्या विरोधात लिहिणाऱ्या – बोलणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते. शेतकरी 9 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत त्याची साधी दखलही पंतप्रधान घेत नाहीत. बेरोजगारी, महागाईचा प्रश्न गंभीर असून देशातील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तरुणांनीच आवाज बनून उभे ठाकले पाहिजे.

या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष एम. एम. शेख, संजय राठोड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संपत कुमार, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद हिशम उस्मानी, जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, माजी खासदार उत्तमसिंग पवार, प्रदेश सरचिटणीस तथा ‘व्यर्थ न हो बलिदान’ अभियानाचे समन्वयक विनायक देशमुख, अभय छाजेड, मिनाताई शेळके, मुज्जफर खान, पापा मोदी, जितेंद्र देहाडे, देवानंद पवार आदी उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यसैनिक व स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात करण्यात आले.

इतर बातम्या

मोदी म्हणतात, भारत-पाक फाळणीचा स्मृती दिन साजरा करणार; पटोले म्हणातात, हा तर देशांतर्गत फाळणीचा डाव

..तेव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते हे माहिती नव्हतं का?, नाना पटोलेंचा खोचक सवाल

(Congress fights to keep constitution and unity of the country : Nana Patole)

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.