धक्कादायक! अहमदनगरला निघालेल्या 22 पैकी 19 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह! काय आहे बीडमधील कोरोनाची स्थिती?

बीडमधील वडवणी येथून अहमदनगरला डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी जाणाऱ्या 22 पैकी 19 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन हादरले आहे. या रुग्णांना त्वरीत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

धक्कादायक! अहमदनगरला निघालेल्या 22 पैकी 19 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह! काय आहे बीडमधील कोरोनाची स्थिती?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 2:55 PM

बीड (वडवणी): बीड जिल्ह्यातील वडवणी (Wadawani Beed) तालुक्यातून अहमदनगर (Ahmednagar) येथे नेत्र शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या 22 रुग्णांपैकी तब्बल 19 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. एकाच वेळी एवढ्या रुग्णांना कशी बाधा झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण वडवणी तालुक्यातील असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी वडवणी शहरातील एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे ही शाळा सोमवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

अहमदनगर जिल्ह्यात जाणारे होते रुग्ण

वडवणी येथून अनेक जण अहमदनगर येथे डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी जात असतात. गुरुवारी 22 रुग्ण अशाच शस्त्रक्रियेसाठी निघाले होते. वाटेत एका आरोग्य केंद्रात या सगळ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी 19 जण पॉझिटिव्ह आले. हे अहवाल आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना धक्काच बसला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकदाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांनी ही माहिती तत्काळ तालुका स्तरावरील आरोग्य अधिकाऱ्यांना दिली. या सर्वांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकारामुळे वडवणीत भीतीचे वातावरण निर्माण झाले.

बीडमध्ये रुग्ण वाढतायत?

दोन दिवसांपूर्वी वडवणी शहरातील एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे ही शाळा सोमवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांच्या संपर्कातील इतर विद्यार्थ्यांच्या चाचण्याही घेण्यात येणार होत्या.

अंबाजोगाई, आष्टी, बीड, केजमध्येही नवे रुग्ण

जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे आणखी सहा रुग्ण आढळले. यात अंबाजोगाई, आष्टी, बीड, केजमधील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 590 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 701 कोरोनामुक्त झाले असून 2 हजार 833 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 53 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख यांनी दिली.

इतर बातम्या-

सोमवारपर्यंत जे कर्मचारी कामावर येतील त्यांचं निलंबन मागे घेऊ, एसटी कामगारांना एक संधी देणार, तूर्तास मेस्मा नाही; अनिल परब यांची मोठी घोषणा

School: शाळा सुरु करण्याचा एकत्रित निर्णय 15 डिसेंबरला राज्यस्तरावर घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.