Corona updates: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत कोरोनाचा विस्फोट, औरंगाबाद, लातूर, नांदेडमध्ये काय स्थिती?

राज्याप्रमाणे मराठवाड्यातील लातूर, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झालेला दिसून आला. बुधवारी या तिन्ही जिल्ह्यांतील रुग्णसंख्येची आकडेवारी अचानक वाढली.

Corona updates: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत कोरोनाचा विस्फोट, औरंगाबाद, लातूर, नांदेडमध्ये काय स्थिती?
Corona test
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 11:14 AM

औरंगाबादः मागील आठवड्यापासून औरंगाबादेतील कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या वाढतच होती. मात्र बुधवारी रुग्णसंख्येचा विस्फोट पहायला मिळाला. मागील 24 तासात शहरात तब्बल 410 रुग्ण आढळून आले. शहरातील दर 100 रुग्णांमागे 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. औरंगाबादप्रमाणेच मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडमधील कोरोना रुग्णांची आकडेवारीदेखील 400 च्या घरात पोहोचली आहे.

मराठवाड्यात काय स्थिती?

नांदेडमध्ये बुधवारी 474 नवे कोरोनाबाधित आढळले. यात मनपा हद्दीत 346 रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल 23 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र बाधितांना सौम्य लक्षणे जाणवत असून रुग्णालयात भरती करण्याचे प्रमाण कमी आहे. लातूर जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला. बुधवारी येथील रुग्णांचा आकडा 434 एवढा नोंदला गेला. येथील पॉझिटिव्हिटी रेटही 15.6 वर पोहोचला आहे. जालना जिल्ह्यात बुधवारी 97 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. परभणी जिल्ह्यात बुधवारी 73 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. येथील पॉझिटिव्हिटी रेट 2.33 असल्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात बुधवारी 22 रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात 38 कोरोना रुग्णांची नोंद झाली.

घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या जास्त

दरम्यान, राज्याप्रमाणे मराठवाड्यातील रुग्णांची आकडेवारी चिंताजनक असली तरीही रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, ही बाब सकारात्मक आहे. सर्वात मोठा दिलासा म्हणजे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या नगण्या असून घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा तुलनेने जास्त आहे. रुग्णांसाठी बेड्सची उपलब्धता मोठ्या प्रमाणात केली असली तरी शिल्लक बेडच जास्त असल्याचे दिसून येत आहेत.

ढगाळ वातावरणामुळे आरोग्यवर परिणाम

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचे बदल दिसून येत आहे. मध्येच कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी पावसाची रिपरिप तर काही ठिकाणी गारपीट होतेय. मराठवाड्यात थंडगार वाऱ्याचाही सामनाही नागरिकांना करावा लागतोय. अनेक भागात कित्येक दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. अशा वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत असून घरोघरी सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण आढळत आहेत.

इतर बातम्या-

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांच्या बैठकीला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार? राजेश टोपे आढावा मांडणार

IPL 2022 साठी BCCI च्या ‘प्लॅन B’ मध्ये UAE ला स्थान नाही, यजमानपदासाठी दोन देशांची नावे पुढे

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.