औरंगाबादेत आजपासून 9 दिवस मेगा लसीकरण, मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेला विद्यार्थी, शिक्षकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU Aurangabad) आणि संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापकांसाठी 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान (9 दिवस) कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. राज्य शासनाने सुरु केलेल्या कवचकुंडल मोहिमेअंतर्गत लसीकरणाचे (Corona Vaccination) उद्दिष्ट औरंगाबाद मनपाला पूर्ण करायचे आहे. त्यामुळे सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर […]

औरंगाबादेत आजपासून 9 दिवस मेगा लसीकरण, मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेला विद्यार्थी, शिक्षकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 1:13 PM

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU Aurangabad) आणि संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापकांसाठी 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान (9 दिवस) कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. राज्य शासनाने सुरु केलेल्या कवचकुंडल मोहिमेअंतर्गत लसीकरणाचे (Corona Vaccination) उद्दिष्ट औरंगाबाद मनपाला पूर्ण करायचे आहे. त्यामुळे सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांनी केले आहे.

महाविद्यालयांमध्ये मोहिमेला वेग

महाराष्ट्र शासनाच्या मिशन युवा स्वास्थ्य कोविड-19 अर्थात कवचकुंडल मोहिमेअंतर्गत लसीकरण केले जाणार आहे. ज्यांनी अद्याप लसीकरणाचा एकही डोस घेतला नाही, किंवा एक झाला दुसरा बाकी आहे, अशा विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी संबंधित महाविद्यालय किंवा विद्यापीठात जाऊन लस घ्यायची आहे. प्राचार्य आणि संस्थाचालकांनी या मोहिमेसाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही डॉ. निंबाळकर यांनी दिल्या आहेत. दरम्यान, विवेकानंद कला, सरदार दलीपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि मनपातर्फे सोमवारी (25 ऑक्टोबर) सकाळी दहा वाजेपासून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रशासकीय अधिकारी प्रभाकर मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास वनारे, उपप्राचार्य डॉ. डी. आर. शेंगुळे, उपप्राचार्य डॉ. आर. बी. शेजूळ यांनी केले आहे.

शासकीय- निमशासकीय महाविद्यालयांमध्ये लसीकरण

आरोग्य मंत्री राजेश टोपे व उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 21 ऑक्टोंबर 2021 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाविद्यालयीन 18 वर्षावरील विद्यार्थ्यी, विद्यार्थिनीं व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे कोविड लसीकरण 100% करून घेण्यासाठी मिशन युवा स्वास्थ राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. औरंगाबाद शहराच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय-निमशासकीय व खाजगी महाविद्यालय दिनांक 20 ऑक्टोंबर 2021 पासून सुरू झाली आहेत. या महाविद्यालयातील 18 वर्षावरील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे covid-19 लसीकरण पहिला व दुसरा डोस पूर्ण करून घेण्यासाठी 25 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर 2021 दरम्यान मिशन युवा स्वास्थ महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जात आहे .या काळात मनपा आरोग्य विभागातर्फे शहरातील सर्व महाविद्यालयात covid-19 लसीकरणासाठी पथक पाठवले जाणार असून 100% लसीकरण करून घेण्यात येणार आहे.

शहरात 33 टक्के नागरिकांचे दोन डोस पूर्ण

covid-19 लसीकरणासाठी महानगरपालिका औरंगाबादला दिलेले उद्दिष्ट 10, 55, 600 इतकी असून 9, 36, 082 इतके साध्य झाले आहे. त्यातील पहिला डोस 5,87, 717 ( 55.68%) झाली आहे तर दुसरा डोस 3,48,365( 33%) झाले आहेत. मिशन युवा स्वास्थ्य मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढे यावे तसेच औरंगाबादकरांनी 100% लसीकरण करून घ्यावे त्यांच्यासाठी शहरात 75 ते 80 बुथ दररोज सुरु ठेवण्यात येणार असून ज्या नागरिकांचे लसीकरण झाले नाही त्यांनी बुथवर जाऊन लसीकरण करून करून घ्यावे, असे आवाहन डॉक्टर पारस मंडलेचा यांनी केले आहे. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात 85 ते 90 महाविद्यालय असून आरोग्य विभागाने महाविद्यालयांशी संपर्क करून covid-19 लसीकरण सत्राच्या तारखा निश्चित केल्या जात आहेत.

इतर बातम्या-

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणारच, पालकमंत्री सुभाष देसाईंचं खासदार इम्तियाज जलील यांचं प्रत्युत्तर

धक्कादायकः चेकपॉइंटवर तपासणीसाठी बसमध्ये शिरलेल्या कर्मचाऱ्याचेच अपहरण व मारहाण, औरंगाबादमधील घटना

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.