औरंगाबादेत बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, 25 हजारांत एक लाखाचा धंदा! 6 लाखांचे खोटे चलन बाजारात?

औरंगाबादेत बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

औरंगाबादेत बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, 25 हजारांत एक लाखाचा धंदा! 6 लाखांचे खोटे चलन बाजारात?
नकली नोटा प्रकरणात एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाला अटक
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 12:22 PM

औरंगाबादः दोन वर्षांपूर्वी बनावट नोटा (Fake note) छापून विक्री केल्याप्रकरणी अटक झालेल्या आरोपीने जामीनावर पुन्हा सुटून आल्यानंतर पुन्हा तोच धंदा सुरु केल्याचं औरंगाबादेत उघडकीस आलं आहे. मुकुंदवाडी परिसरात भाड्याने जागा घेऊन या आरोपींनी पुन्हा नोटांचा कारखाना सुरु केला. मात्र पोलिसांनी मंगळवारी हा कारखाना उध्वस्त केला आणि मुख्य आरोपीसह पाच जणांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीसुसार, या कारखान्यात 50,100,500 रुपयांची नोट छापणे सुरु होते. ही टोळी 25 ते 50 हजारांत 1 लाखांपर्यंतच्या बनावट नोटा निकायची. ते स्वतःदेखील गरजेच्या वस्तू याच नोटांनी खरेदी करत असत. अशा प्रकारे त्यांनी जवळपास 6 लाखांच्या नोटा बाजारात चालवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दुकानदाराला मिळाली बनावट नोट, अन् बिंग फुटले!

दोन दिवसांपूर्वी पुंडलिकनगर परिसरातील सुपर वाइन शॉपमध्ये एका मजुराने बनावट नोट देऊन दारू खरेदी केली. संध्याकाळी गर्दीच्या वेळात ते कळले नाही. मात्र लक्षात आल्यानंतर दुकानदाराने ती नोट पोलिसांना दिली. खरेदी करणारा नेहमीचा ग्राहक असल्याने पोलिसांनी सापळा रचना. दुसऱ्या दिवशीही त्याने बनावट नोट दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी समरान ऊर्फ लकी रशीद शेख याला अटक केली. तसेच नितीन चौधरी, अक्षय पडूळ, दादाराव गावंडे, रघुनाथ ढवळपुरे या तिघांनाही अटक केली. न्यायालयाने त्यांना 3 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली.

जामीनावर सुटलेला समरान पुन्हा त्याच मार्गावर

बीएससी संगणकशास्त्रात पदव्युत्तर झालेला समरान काही वर्षांपूर्वी भोपाळला सॉफ्टवेअरचे क्लासेस करण्यासाठी गेला होता. तो नाशिक, बदनापूर, मालेगाव, जालना, पुण्याला बनावट नोटांचा पुरवठा करायचा. मुकुंदवाडी परिसरात 1 नोव्हेंबर 2019 रोजी सहाय्यक निरीक्ष सोनवणे यांनी बनावट नोटाप्रकरणी समरानसह त्याचा मित्र सय्यद असद व सय्यद सलीम सय्यद मोहंमद यार यांना अटक केली होती. एटीएस व गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी केली असता भोपाळला त्याने बनावट नोटा तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकल्याचे सांगितले होते. 13 महिने कारागृहात राहिल्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये कोरोनाचे कारण देत त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. हायकोर्टाने तो मंजूर केला. तुरुंगातून बाहेर आल्यावर तो नेहमी कॅनोट प्लेसमध्ये जात असे. तिथे नितीनला त्याने या धंद्याची माहिती दिली. नितीनसह इतरांनाही या धंद्यात ओढले.

इतर बातम्या-

work from home | मुलांसोबत राहून कठीण जातोय वर्क फ्राम होम; या पाच टिप्स तुमचे काम करतील सोपे

पार्टी करण्यासाठी पूर्ण वर्ष, गर्दी करणाऱ्यांवर कठोर

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.