धक्कादायकः अडीच दिवसाला बलात्कार, 6 दिवसाला खून, बीडचा क्राइम रेट घातकच!

शेती-संपतीचे वाद, टोकाची सूडभावना, अनैतिक संबंध आणि संशयातून कधी मुलगा जन्मदात्याचा खून करतो तर कधी पिताच पोटच्या पोराचा जीव घेतो, अशा घटना समोर आल्या आहेत.

धक्कादायकः अडीच दिवसाला बलात्कार, 6 दिवसाला खून, बीडचा क्राइम रेट घातकच!
crime
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 5:11 PM

बीडः सततचे खून, दरोडे, बलात्कार, घरफोडी, जबरी चोरीच्या घटना यांनी बीड जिल्हा (Beed Crime rate) अक्षरशः हादरून गेला आहे. सतत घडणाऱ्या गुन्ह्यांच्या बातम्या झळकत असतात. कुणी नातेवाईक परस्परांच्या जीवावर उठतात तर मित्रच मित्राच्या डोक्यावर वार करून त्याचा खून करतात. महिला अत्याचाराचा (Challenge for Beed Police) प्रश्नही गंभीर बनला आहे. गुन्हेगारीचा हा वाढता आलेख आहे बीड जिल्ह्याचा. नव्या आकडेवारीनुसार विचार केल्यास बीडमध्ये अवघ्या अडीच तासाला एक महिला वासनेची शिकार होत आहे तर सहा दिवसाला एकाची हत्या घडत आहे.

लॉकडाऊननंतर गुन्हेगारीचा आलेख वाढला

बीडमध्ये चोरीचे गुन्हे मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढले आहेत. विनयभंगाच्या गुन्ह्यांतरी भर पडलेली आहे. 2020 मध्ये ऑक्टोबर अखेरपर्यंत विनयभंगाच्या 270 घटना घडल्या होत्या. यंदा गुन्ह्यांची संख्या 325 एवढी झाली आहे. तसेच सरकारी नोकरांवरील हल्ले व बाललैंगिक अत्याचारात मात्र घट झालेली दिसून येत आहे. 2020 मध्ये जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान 55 सरकारी नोकरांवर हल्ले झाले होते, यंदा ही संख्या 41 आहे. गेल्या वर्षी दहा महिन्यांत 48 अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाला होता. यंदा हा आकडा 31 इतका आहे. मागील वर्षी अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे 73 गुन्हे घडले होते. या वर्षी गुन्ह्यांची नोंद 69 अशी आहे.

ऑक्टोबर 2021 पर्यंत किती गुन्हे?

बीड जिल्ह्यात ऑक्टोबर 2021 पर्यंत 48 खून, 128 खुनाचे प्रयत्न, 128 बलात्कार, 18 दरोडे, 32 जबरी चोऱ्या, 46 घरफोडी, 293 चोऱ्या तर 328 मारामाऱ्या झाल्या आहेत.

इंजिनिअरिंगचा विद्यार्थी पित्याचा मारेकरी

शेती-संपतीचे वाद, टोकाची सूडभावना, अनैतिक संबंध आणि संशयातून कधी मुलगा जन्मदात्याचा खून करतो तर कधी पिताच पोटच्या पोराचा जीव घेतो, अशा घटना समोर आल्या आहेत. परळीत प्लॉटिंगचे व्यापारी अजय लुंकड यांचा मृतदेह राहत्या घरी आढळून आल्यानंतर शहर पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवली. त्यांचा जेमतेम 19 वर्षांचा मुलगा सिद्धार्थ यानेच त्यांना थंड डोक्याने संपवल्याचे तपासात निष्पन्न झाले. वडील आपल्यावर प्रेम करीत नाहीत, काँप्यूटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी पुण्याऐवजी औरंगाबादला ठेवल्याचा राग असह्य झाल्याने हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली.

नव्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर आव्हान

जिल्हा पोलीस दलात गेल्या काही दिवसांत मोठे फेरबदल झाले आहेत. अंबेजोगईच्या अप्पर अधीक्षक कविचा नेरकर, केजचे सहाय्यक अधीक्षक आयपीएस पंकज कुमावत, आष्टीचे उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर हे नवे अधिकारी रूजू झाले आहेत. त्यामुळे अनेक ठाण्याचे प्रमुखही नवीन आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासह गुन्हेगारीला ब्रेक लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

इतर बातम्या-

आधीच शाळा नाही, त्यात आत मनमानी सुट्ट्या, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्ट्या वाढल्या, विद्यार्थ्यांचा विचार कधी?

रेशन-पेट्रोल बंद झाल्यावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा, औरंगाबादेत आरोग्य केंद्रांवर गर्दी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.