Aurangabad: कंपनी संचालकाला 36 लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळीतील एकाला अटक, 19 खात्यात पैसे वळवले
आरोपीला बिहारमधून पोलिसांनी अटक केले. बिहारमधील सिवान जिल्ह्यातून राजकपूर शुक्ला या आरोपीला अटक केली आहे. तो पुण्यातील एका कंपनीत लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत होता. व्यवहारानंतर तो मूळ गावी परतला होता.
औरंगाबादः शहरातील नामांकित कंपनीच्या संचालकाच्या बनावट ईमेलद्वारे (Fake email) बँकेच्या खात्यातून 36 लाखांचा अपहार (Cyber crime) करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात औरंगाबाद सायबर पोलिसांना यश आले. या टोळीतील एका आरोपीला सायबर पोलिसांनी (Cyber police) बिहारमधून अटक केली. त्याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.
आर.एल. स्टील्स कंपनीच्या संचालकाची फसवणूक
शहरातील नामांकित आर.एल. स्टील्स अँड एनर्जी कंपनीचे सरव्यवस्थापक विवेक घारे यांनी सायबर पोलिसांकडे 22 नोव्हेंबरला तक्रार केली होती. कंपनीचे संचालक नितीन गुप्ता यांच्या नावाच्या ईमेल आयडीवरून पंजाब नॅशनल बँकेला 22 नोव्हेंबर रोजी एक मेल आला होता. मेलमध्ये चौघांच्या खात्यात 36 लाख 12 हजार रुपये ट्रान्सफर करण्याची विनंती केली होती. तसेच राहुल गिरे यांनी कंपनीचे एमडी नरेंद्र कुमार गुप्ता यांच्याकडे खातरजमा केली होती. त्यांनी दुजोरा दिला. कंपनीचे रुपसिंग राजपूत यांना ही फसवणूक लक्षात आली.
8 दिवसात तपासात आरोपीचा शोध
22 नोव्हेंबर रोजी सायबर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांची पथके आठ दिवसात आरोपीपर्यंत पोहोचली. यातील ज्या चार खात्यात पैसे वळते करण्यात आले होते त्यात HDFC आणि ICICI बँकेच्या दोन-दोन खात्यांचा समावेश होता. त्यात रंजित कुमार गिरी, मनोज कुमार, प्रसून दास व संकर सेन नावाने बँक खाते होते. पुढे आणखी चार बँक खात्यात पैशांचे वाटप झाले. त्यानंतर 16 ते 19 बँक खात्यात पैशाचे वाटप करत गुन्हेगार मूळ खात्यातून पैसे काढून घेत गेले. पोलिसांनी त्या सर्व बँक खात्यांतील व्यवहारांचे विश्लेषण सुरु केले आहे. यात साडेचार लाख रुपये वळते झालेले एक बँक खाते मिळाले. त्याच आरोपीला बिहारमधून पोलिसांनी अटक केले. बिहारमधील सिवान जिल्ह्यातून राजकपूर शुक्ला या आरोपीला अटक केली आहे. तो पुण्यातील एका कंपनीत लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत होता. व्यवहारानंतर तो मूळ गावी परतला होता.
इतर बातम्या-