मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, आमदार सतीश चव्हाणांची मागणी, तर हेक्टरी ५० हजार मदत देण्याची भाजपची मागणी

शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.29) राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, आमदार सतीश चव्हाणांची मागणी, तर हेक्टरी ५० हजार मदत देण्याची भाजपची मागणी
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांची मागणी
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 5:00 PM

औरंगाबाद: गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेली असून शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शासनाने मराठवाड्यात त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी आज (दि.29) राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray ), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. तर भाजप ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष विजय औताडे (Vijay Autade, BJP) यांनीही मराठवाड्यातील शेतीची स्थिती पाहता हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.

सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी- चव्हाण

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात जवळपास 21 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. त्याचेच पंचनामे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे नवीन नुकसानीचे पंचनामे कधी होणार?, अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याने पंचनामे तरी कशाचे करणार? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. त्यामुळे पंचनामे न करता शासनाने मराठवाड्यात त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.

हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी- विजय औताडे

मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे पिके भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता हेक्टरी ५० हजार रु. मदत जाहीर करावी , अशी मागणी भाजपाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विजय औताडे यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे एवढे नुकसान होऊनही आघाडी सरकारमधील मराठवाड्याचे मंत्री चकार शब्द उच्चारत नाहीत याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे , असेही त्यांनी म्हटले आहे.

ठाकरे यांनी आपणच केलेली मागणी मान्य करावी

सत्तेवर येण्यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना ५० हजार रु. हेक्टरी भरपाई देण्याची मागणी केली होती. आता ठाकरे यांनी आपण केलेली मागणी पूर्ण करावी आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी विजय औताडे यांनी केली आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचंही मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान,  औरंगाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधवांचं उभं पीक वाहून गेल्याचं आणि शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठमोठे खड्डे पडल्याचे  निदर्शनास येत असून त्याच शेतजमीनीवर शेती करणे शक्य होणार नाही. शेतकरी बांधवांचं फार मोठं नुकसान परतीच्या पावसाने झालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लगोलग औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

इतर बातम्या-

Aurangabad Rain: मध्यरात्रीतून पकडला पावसानं जोर, गुलाब चक्रिवादळामुळे औरंगाबादेत  पुन्हा ढगफुटी, सरींचा वेग काय होता?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.