अंत्यविधीसाठी निघालेले प्रेत थेट ग्रामपंचायतीच्या ओट्यावर, औरंगाबादच्या दिगर गावात कशाचा वाद पेटला?

औरंगाबाद जिल्ह्यातील दिगर ग्रामस्थांनी रविवारी एका ग्रामस्थाची अंत्ययात्र थेट ग्रामपंचायतीसमोर नेली. गावातील स्मशानभूमीचा वाद संपल्याशिवाय इथून हलणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली.

अंत्यविधीसाठी निघालेले प्रेत थेट ग्रामपंचायतीच्या ओट्यावर, औरंगाबादच्या दिगर गावात कशाचा वाद पेटला?
रविवारी दिगर ग्रामपंचायतीसमोर मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते.
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 2:39 PM

औरंगाबादः जिल्ह्यातील पिशोर येथील दिगर गावातील लोकांनी काल एका ग्रामस्थाच्या मृत्यूनंतर मोठी आक्रमक भूमिका घेतली. संतप्त नातेवाईकांनी पिशोर ग्रामपंचायत कार्यालयासमोर अत्यंयात्र रोखून ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत अंत्यविधी होणार नाही, अंत्ययात्र येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतल्याने पिशोर येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

काय आहे स्मशानभूमीचा वाद?

पिशोर गावात एकूण चार ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा आहे. त्या भागातील लोकांना कुठल्याही परिस्थितीत अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पण दिगर भागातील लोकांना अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी शेजारी असलेले शेतकरी जागा आमची असल्याचा दावा करत आहेत. त्यांनी अनेक वेळा लोकांशी याबाबत वाद घातले. मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. दिगर भागातील शांताबाई सूर्यभान खडके यांचे शनिवारी निधन झाले. ही महिला महानुभाव पंथाची असल्याने त्यांना भूमी डाग द्यावा लागतो. अंत्यविधीसाठी दिगर स्मशानभूमीकडे नेत असताना तेथील नेहमीचा विरोध लक्षात घेता, लोकांनी अंत्ययात्र थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोरच आणली. आम्हाला अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लोकांनी केली.

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर अंत्यसंस्कार

दरम्यान ग्रामपंचायतीवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि प्रेत आल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला. तहसीलदारांनी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले. नंतर सदर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इतर बातम्या-

Video : वरातीवेळीच नवरदेवाची पॅन्ट फाटली! लग्नात उपस्थित लोकही पोट धरुन हसले

VIDEO : Devendra Fadnavis | गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा फडणीसांकडून विधानसभेत उपस्थित

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.