लेबर कॉलनी क्वार्टरवर दिवाळीनंतर बुलडोझर फिरणार, कारवाईच्या नोटिसीने रहिवासी धास्तावले, इम्तियाज यांची भेट

औरंगाबादः जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी विश्वासनगर, लेबर कॉलनी (Labor colony) येथील 20 एकर जागेतील धोकादायक आणि राहण्यासाठी अयोग्य असलेली निवासस्थाने पाडण्यात यावे, असे आदेश दिले. 31 ऑक्टोबर रोजी रात्री सुनिल चव्हाण यांच्या आदेशाने महापालिका, बांधकाम विभागाने ही नोटीस जारी केली आहे. त्यानुसार, येथील नागरिकांना येत्या आठ दिवसांत सदनिका रिकाम्या कराव्या लागणार आहेत. विश्वासनगरमध्ये […]

लेबर कॉलनी क्वार्टरवर दिवाळीनंतर बुलडोझर फिरणार, कारवाईच्या नोटिसीने रहिवासी धास्तावले, इम्तियाज यांची भेट
औरंगाबाद लेबर कॉलनीतील जीर्ण घरे पाडण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 7:55 PM

औरंगाबादः जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी विश्वासनगर, लेबर कॉलनी (Labor colony) येथील 20 एकर जागेतील धोकादायक आणि राहण्यासाठी अयोग्य असलेली निवासस्थाने पाडण्यात यावे, असे आदेश दिले. 31 ऑक्टोबर रोजी रात्री सुनिल चव्हाण यांच्या आदेशाने महापालिका, बांधकाम विभागाने ही नोटीस जारी केली आहे. त्यानुसार, येथील नागरिकांना येत्या आठ दिवसांत सदनिका रिकाम्या कराव्या लागणार आहेत.

विश्वासनगरमध्ये 338 सदनिका

विश्वासनगरमध्ये 338 सदनिकाक आहेत. 1953-54 आणि 1980-91 या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या संपूर्ण निवासस्थानांची देखभाल करण्यात येत आहे. 1985 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढलेले आहेत. ते आदेश सर्व न्याय संस्थांनी कायम ठेवले आहेत. 2004 मध्ये बांधकाम विभागाने सदनिका धारकांना नोटीस बजावली होती. येथील इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आले आहे. त्यामुळे या इमारती पाडाव्या लागणार आहेत. नोटीशीत तसा उल्लेखही केला होता. मात्र अद्याप येथील नागरिकांनी त्यावर अंमलबजावणी केलेली नाही.

शासकीय निवासस्थानांची अवैधरित्या विक्री

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 1980-81 पूर्वी तात्पुरत्या काळासाठी सदनिका दिल्या होत्या. संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी शासकीय सेवेतून निवृत्त झाले. काही जण मयत झाले. तरीही अनेकांनी बांधकाम विभागाकडे सदर जागेचे हस्तांतरण केलेले नाही. त्यांच्या वारसांनी त्या निवासस्थानात पोटभाडेकरू ठेवले. घरकुल विकले. , ही एक प्रकारची फसवणूक असल्याचे नोटिसीत म्हटले आहे. विश्वास नगर येथील शासकीय निवासस्थानांमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या व शासकीय निवासस्थानांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे. ती जागा शासनाची आहे. त्यामुळे तेथे अतिक्रमण करून राहणे ही फसवणूकच आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयातदेखील येथील रहिवाशांचे अपील फेटाळण्यात आले आहे.

इतर बातम्या-

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमकडून तिरंगा रॅलीची घोषणा, तर वंचितसोबत आघाडीचे ओवेसींचे संकेत!

पत्नीच्या त्रासाला कंटाळून बेपत्ता , मोबाइलवर आत्महत्येचा मेसेज, औरंगाबादेतले कुटुंब धास्तावले, शोध सुरू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.