आधीच शाळा नाही, त्यात आत मनमानी सुट्ट्या, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्ट्या वाढल्या, विद्यार्थ्यांचा विचार कधी?

नेक महिने बंद असलेली शाळा ऑक्टोबर महिन्यात सुरु झाली खरी पण पंरपरागत दिवाळी सणाला शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली. औरंगाबादसह काही जिल्ह्यांत मर्यादित दिवाळीच्या सुट्ट्या आणखी वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विद्यार्थी हिताचा विचार शासन करणार आहे की नाही, असा प्रश्न विद्यार्थी-पालकांना सतावतो आहे.

आधीच शाळा नाही, त्यात आत मनमानी सुट्ट्या, औरंगाबादसह अनेक जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्ट्या वाढल्या, विद्यार्थ्यांचा विचार कधी?
महापालिका शाळा सुरु करण्यास अनुकूल, मात्र लसीकरणाशिवाय पहिली ते पाचवीची शाळा नको
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 7:16 AM

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले अनेक महिने शाळा बंद आहेत. कोरोनाच्या केसेस कमी झाल्या की शाळा सुरु करण्याची घोषणा होते. काहीच दिवसांत कोरोना वा कुठल्याशा कारणाने शाळेला सुट्टी दिली जाते. अनेक महिने बंद असलेली शाळा ऑक्टोबर महिन्यात सुरु झाली खरी पण पंरपरागत दिवाळी सणाला शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली. औरंगाबादसह काही जिल्ह्यांत मर्यादित दिवाळीच्या सुट्ट्या आणखी वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विद्यार्थी हिताचा विचार शासन करणार आहे की नाही, असा प्रश्न विद्यार्थी-पालकांना सतावतो आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे एकूण 14 दिवसांची सुट्टीची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. याच सुट्टीत आता काही दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

दिवाळीच्या सुट्ट्या वाढवल्या, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात समन्वयाचा अभाव

शालेय शिक्षण विभागाने दिवाळीच्या सुट्ट्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता, 22 नोव्हेंबरपासून औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा आता सुरु होणार आहे. केवळ औरंगाबादच नाही तर आणखीही बऱ्याच जिल्ह्यांत दिवाळीच्या सुट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अचानक वाढवलेल्या सुट्ट्यांमुळे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसू लागला आहे. माध्यमिक विभागाने प्राथमिक शिक्षण विभागाशी समन्वय न ठेवता परस्पर निर्णय घेतल्याने प्राथमिक शिक्षकांकडूनही दिवाळीच्या सुट्टीत वाढ करण्याची मागणी केली आहे.

14 दिवसांची दिवाळी सुट्टी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना आणखी 12 दिवसांची वाढीव सुट्टी

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा 4 ऑक्टोबर 2021 पासून ऑफलाईन स्वरुपात सुरु झाल्या आहेत. राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वी च्या शाळांना विविध धार्मिक सण/उत्सावासाठी सुट्ट्या घोषित करण्यात येत असतात. त्यानुसार 2021-22 या शैक्षणिक वर्षात दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना 28 ऑक्टोबर 2021 ते 10 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात आली होती. ती सुट्टी काल संपली होती. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरु असलेले अध्यापनाचे कामकाज बंद होते.

(Diwali holidays increased in maharashtra many districts including Aurangabad School will begin on November 22nd)

हे ही वाचा :

दिन दिन दिवाळी… महाराष्ट्रातील शाळांना 14 दिवसांची सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्र्यांकडून दिवाळीच्या शुभेच्छा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.