Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad| हवामानाचा अचूक अंदाज सांगणारी सी बँड रडार लवकरच येणार, जागा सज्ज ठेवा, राज्य सरकारचे काय पत्र!

औरंगाबादेत हे रडार कुठे बसवायचे, ज्यामुळे संपूर्ण विभागातील हवामान बदलाचा अचूक अंदाज घेणे शक्य होईल, या संदर्भातली माहितीही केंद्र सरकारच्या पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आली आहे.

Aurangabad| हवामानाचा अचूक अंदाज सांगणारी सी बँड रडार लवकरच येणार, जागा सज्ज ठेवा, राज्य सरकारचे काय पत्र!
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 3:00 AM

औरंगाबादः मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हदलत्या हवामानाचा अचूक अंदाज येण्याकरिता यासाठी ठोस अशी यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. हवामानाचा अचूक अंदाज आल्यास शेतीचे संभाव्य नुकसान टाळता येईल, असा यामागील उद्देश आहे. यासाठी केंद्र सरकारच्या पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाने औरंगाबाद जिल्ह्यात सी बँड डॉप्लर रडार (Doppler radar) बसवण्यास नोव्हेंबर महिन्यात परवानगी दिली होती. आता केंद्राने राज्य शासनामार्फत औरंगाबाद जिल्हा प्रशासनाला(Aurangabad district) खुलताबाद किंवा म्हैसमाळ यापैकी एका ठिाकणी 40 चौरस मीटर जागा सज्ज ठेवा, असे निर्देश दिले आहेत. याबाबतचे एक पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला (Collector office) प्राप्त झाले आहे.  मराठवाड्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासात हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. येथील आठही जिल्गह्यांतील भूभागातील हवामानाचा अचूक अंदाज घेणे सोपे जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची डॉपलर रडार यापूर्वी केवळ नागपूर, गोवा, मुंबई, सोलापूर, याठिकाणीच उपलब्ध आहे.

डॉ. भागवत कराड यांचे प्रयत्न

निसर्गाच्या लहरीपणामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे गेल्या काही वर्षांपासून आतोनात हाल होत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वातावरण बदलाची अचूक माहिती मिळावी, वारंवार नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे शेतीचे नुकसान थांबावे यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. मागील नोव्हेंबर महिन्यातच या रडारला मंजुरी देण्यात आली होती. आता औरंगाबादेत हे रडार कुठे बसवायचे, ज्यामुळे संपूर्ण विभागातील हवामान बदलाचा अचूक अंदाज घेणे शक्य होईल, या संदर्भातली माहितीही केंद्र सरकारच्या पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना कसा फायदा होणार?

भारतीय हवामान खाते आणि विज्ञान मंत्रालय यांच्या माध्यमातून म्हैसमाळ इथं सी बँड रडार बसवण्यात येण्याची शक्यता आहे. शेती क्षेत्राच्या विकासाबाबत सी बँड डॉपलर रडार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. – या रडारच्या क्षेत्रात 300 ते 400 किमीचा भूभाग किंवा परीघ येणार असून यासाठी पंधरा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. – रडार कार्यान्वित होताच, शेतकऱ्यांना हवामान बदलासंदर्भात अचूक माहिती मिळणार आहे. – मराठवाड्यात सातत्याने पडणारा दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. केंद्र आणि राज्य सरकारने 10 वर्षांत किमान 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या अनुदानावर खर्च केले आहेत. या सर्व परिस्थितीत औरंगाबाद येथील सी-बँड डॉपवर रडार फायदेशीर राहणार आहे.

इतर बातम्या-

कार्यकर्ते म्हणाले, साहेब, केकचा तरी मान ठेवा अन् खासदारांनी जोडले हात; श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवस सेलिब्रेशनला नेमकं काय घडंल?

प्रेयसीला इजहार-ए-इश्क करताना तुमची फसगत होऊ नये म्हणून प्रत्येक गुलाब ‘रंग माझा वेगळा’ असं म्हणतो!