औरंगाबादच्या गॅस पाइप लाइनचा भव्य शुभारंभ, ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा, डॉ. भागवत कराड यांचं आवाहन!

औरंगाबादः शहरात पीएनजी (PNG) योजनेअंतर्गत गॅस पाइप लाइनच्या (Aurangabad gas pipe line) कामाचा भव्य शुभारंभ आज आयोजित करण्यात आला आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील घरांमध्ये सिलिंडरऐवजी पाइप लाइनद्वारे गॅस पुरवला जाणार आहे. तसेच ग्राहकांना हा गॅस आताच्या तुलनेत अधिक स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे, असं आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिलं […]

औरंगाबादच्या गॅस पाइप लाइनचा भव्य शुभारंभ, ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा, डॉ. भागवत कराड यांचं आवाहन!
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 11:28 AM

औरंगाबादः शहरात पीएनजी (PNG) योजनेअंतर्गत गॅस पाइप लाइनच्या (Aurangabad gas pipe line) कामाचा भव्य शुभारंभ आज आयोजित करण्यात आला आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील घरांमध्ये सिलिंडरऐवजी पाइप लाइनद्वारे गॅस पुरवला जाणार आहे. तसेच ग्राहकांना हा गॅस आताच्या तुलनेत अधिक स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे, असं आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिलं आहे. डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) आणि भाजपच्या पुढाकारातून आज या योजनेच्या कामाचा भव्य शुभारंभ केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होत आहे. सकाळी 11 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हा सोहळा होत असून जास्तीत जास्त औरंगाबादकर नागरिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन डॉ. भागवत कराड यांनी केले आहे.

भव्य सभामंडप, जय्यत तयारी

शहरातील गॅस पाइप लाइन योजनेच्या कामाचा शुभारंभ अधिक भव्य करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड औरंगाबादमध्ये मुक्कामी आहेत. आज अकरा वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी भव्य सभामंडपाची एरिया 60 हजार स्क्वेअर फिट एवढा आहे, या मध्ये 40 बाय 10 फुट ची एक भव्य एलईडी स्क्रीन असेल ,तसेच आत बसलेल्या सर्व लोकांना व्यवस्थित आवाज यावा, स्टेजवरील सर्व भाषणे दिसावेत या साठी 12 बाय 8 या साईजच्या दहा एलईडी स्क्रीन सभामंडपामध्ये लावण्यात आलेले आहेत , आलेल्या जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून , फुड पॉकेट व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच मुख्य व्यासपीठ हे 60 फुट बाय 30 फुट आहे व उंची सहा फूट एवढी आहे, आवाजाची उच्च क्षमता असणारे स्पीकर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत.

केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची ऑनलाइन उपस्थिती

या कार्यक्रमात माननीय हारदिप सिंग पुरी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री तथा नागरी विकास मंत्री हे दूर दृश्य प्रणालीद्वारे युक्रेन देशाच्या शेजारील हंगेरी या देशामधून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन गंगा या एअरलिफ्ट अभियानासाठी मोदी सरकारने प्रमुख चार मंत्र्यांना युक्रेनच्या युद्धभूमीवर व आजूबाजूच्या सर्व परिसरात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सोडवण्यासाठी व आपल्या मातृभूमीत सकुशल, सुखरूप घेऊन येण्यासाठी या चार मंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया, हरदीपसिंग पुरी, किरण रिजिजू, जनरल व्हि.के. सिंह यांच्यावर सर्व युद्धभूमीवर अडकलेल्या ,भारतीय नागरिकांना कुशल भारतात आणण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे   हरदिप सिंह पुरी दूरदर्शन प्रणालीमार्फत या कार्यक्रमा मध्ये सहभागी होतील, कार्यक्रमा साठी  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.रावसाहेब पाटील दानवे हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. तसेच   आमदार हरिभाऊ नाना बागडे  , आमदार अतुल सावे भाजपा प्रदेश सरचिटणीस, आमदार प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे

इतर बातम्या-

VIDEO: तुमचे मुखवटे उतरवल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही; राऊतांचा इशारा

रणजितसिंह निंबाळकरांचे निकटवर्तीय दिगंबर आगवणेंची तक्रार, निंबाळकरांनी फसवणूक केल्याचा आरोप

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....