ठरलं ! भागवत कराड भगवान भक्तीगडावर दसरा साजरा करणार, पंकजांसोबत हेलिकॉप्टरनं पोहोचणार

औरंगाबाद: पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) दसरा प्रत्येक वेळेस कुठल्या तरी एका कारणामुळे चर्चेत असतो. अर्थातच हे कारण राजकीय जास्त असतं. त्यामुळे चर्चा तर होणारच. आजचा दसरा काय खास असेल याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहेच. त्यातही केंद्रीय मंत्री झालेले आणि कधी काळी दसऱ्याचं स्टेज सांभाळणारे भागवत कराड हजेरी लावणार की नाही याची चर्चा सुरु होती. त्यातच काही […]

ठरलं ! भागवत कराड भगवान भक्तीगडावर दसरा साजरा करणार, पंकजांसोबत हेलिकॉप्टरनं पोहोचणार
दसरा मेळाव्यासाठी डॉ. भागवत कराड औरंगाबादहून रवाना
Follow us
| Updated on: Oct 15, 2021 | 11:06 AM

औरंगाबाद: पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) दसरा प्रत्येक वेळेस कुठल्या तरी एका कारणामुळे चर्चेत असतो. अर्थातच हे कारण राजकीय जास्त असतं. त्यामुळे चर्चा तर होणारच. आजचा दसरा काय खास असेल याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहेच. त्यातही केंद्रीय मंत्री झालेले आणि कधी काळी दसऱ्याचं स्टेज सांभाळणारे भागवत कराड हजेरी लावणार की नाही याची चर्चा सुरु होती. त्यातच काही दिवसांपूर्वी, आता मी केंद्रीय मंत्री झालोय, त्यामुळे बघावं लागेल असं म्हणून कराडांनी कहानीत ट्विस्ट आणलेला होता. पंकजा मुंडेंसोबतच्या त्यांच्या मतभेद-नाराजीच्या पार्श्वभूमीवर कराडांच्या वक्तव्यानं जास्तच उत्सुकता निर्माण केली. पण शेवटी भागवत कराड हे सावरगावच्या भगवान भक्तीगडावर येणार असल्याचं स्पष्ट झालंय. ते औरंगाबादहून परळीला येतील. गोपीनाथगडावरून ते हेलिकॉप्टरनं पंकजांसोबत सावरगावच्या दसरा मेळाव्याला पोहोचत आहे.

दसऱ्याचे नियोजनकर्ते ते केंद्रीय मंत्री!

गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळाव्याची प्रथा सुरु केली. तेव्हा भागवत कराड हे सामान्य कार्यकर्ता होते. तेव्हा संपूर्ण दसरा मेळाव्याचे नियोजन, स्टेजची तयारी, कार्यकर्त्यांचे नियोजन ही सर्व व्यवस्था भागवत कराड यांनी सांभाळली होती. आता मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवल्यावर डॉ. कराड हे स्वतः दसरा मेळाव्याच्या व्यासपीठाची शोभा वाढवणार आहेत. पंकजा मुंडेंप्रमाणेच डॉ. भागवत कराडदेखील या भाषणात काय बोलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंकजा-भागवत कराडांमध्ये वाद का?

मोदी सरकारने केलेल्या नव्या विस्तरात मराठवाड्यातून डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. कराड यांना केंद्रात अर्थराज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा नाराज होत्या. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कराड यांना त्यांनी शुभेच्छाही दिली नव्हती. त्यानंतर वरळी येथील निवासस्थानी झालेल्या सभेत त्यांनी भाजप नेत्यांवर नाव न घेता टीकाही केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी कराड यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिली होती. या घटनेनंतर दोन ते तीन वेळा कराड आणि पंकजा मुंडे यांची भेट झाल्याने त्यांच्यात दिलजमाई झाल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे कराड या मेळाव्याला उपस्थित राहणार का? पंकजा मुंडे त्यांना निमंत्रण देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भगवानगडावर जय्यत तयारी

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावरील 12 एकर परिसरात होणार आहे. मेळाव्याआधी गड परिसरातील डागडूजी आणि इतर कामांनी वेग घेतला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संत भगवान बाबांच्या भव्य मूर्तीच्या खाली असलेल्या गर्भगृहात पाणी साचले होते, तेही बाहेर काढण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी पाणी साचणारच नाही अशी कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे. हा परिसर वॉटर प्रुफ करण्यात येत आहे. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच बाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा मेळावा पार पडणार आहे.

इतर बातम्या-

पंकजा मुंडेंची तोफ भगवान गडावरून धडाडणार; पंकजा यांच्या निशाण्यावर कोण?; भागवत कराड मेळाव्याला उपस्थित राहणार?

रस्त्याच्याकडेला उभं राहून पूरपरिस्थितीची पाहणी करू नका; पंकजा मुंडेंनी जयंत पाटील, धनंजय मुंडेंना डिवचले

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.