Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साहब, मोहल्ले के हर गली में ‘गोलिया’ मिलती है, फिर भी पुलिस कुछ नही करती, औरंगाबादेत मौलानांनी मांडली व्यथा

शहर नशामुक्त करण्यासाठी औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी विशेष बैठक घेतली. यात मौलाना आणि इमाम यांनी काही परिसरात सर्रास नशेच्या गोळ्या विक्री होत असून पोलीस काहीच कारवाई करत नाहीत, अशी तक्रार केली. यावर पोलीस आयुक्त काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साहब, मोहल्ले के हर गली में 'गोलिया' मिलती है, फिर भी पुलिस कुछ नही करती, औरंगाबादेत मौलानांनी मांडली व्यथा
शहर नशामुक्त करण्यासाठी औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी घेतलेली विशेष बैठक
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 1:59 PM

औरंगाबादः शहरातील अनेक तरुण अमली पदार्थांच्या (Drugs) विळख्यात अडकले आहेत. यातून गुन्हेगारी कारवाया वाढत आहेत. गेल्या काही महिन्यात झालेल्या गंभीर घटनांमध्ये नशेबाज तरुणांचा हात असल्याचे उघड झाले होते. तसेच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर राज्यभरात एनसीबीचे नशेच्या रॅकेटवर छापे मारणे सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर औरंबाबादमध्येही पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी शहरात छापेमारी सुरु केली आहे. दोन दिवसांपूर्वी बेगमपूरा आणि सिटी चौक पोलीस स्टेशन तसेच सातारा परिसरात नशेच्या गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या. पण या अवैध धंद्यांच्या मुळाशी जाण्यासाठी गुरुवारी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता (Nikhil Gupta) यांनी शहरातील काही मशिदींच्या इमामांची बैठक बोलवली होती. शहर नशामुक्त करण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा घेण्यात आली.

इमाम, मौलानांनी मांडली व्यथा

या बैठकीत मौलाना इक्बाल अन्सारी व मौलाना नसीम मिफ्ताही यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मौलाना म्हणाले, ‘कमिशनर साहब, शहर के हर मोहल्ले के एक घर में पुडिया बेची जा रही है. मैडिकल पे नशे की गोलिया मिल रही है, हमसे ज्यादा तो पुलिस वालों को खबर होती है, फिर भी कारवाई क्यू नही होती..’ असा सवाल त्यांनी केला. तसेच नसा करणाऱ्यांना कुठलाही धर्म, वय, स्तर नसतो. सर्वांनी एकत्र येऊन धर्म प्रतिनिधींनी मिळून शहर नशामुक्त करू, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन मौलानांनी या बैठकीत दिले.

नशेबाज तरुणाने मित्राचा खून करून डोळे बाहेर काढले

गेल्या काही दिवसांमध्ये शहरात गुन्हेगारी कारवाया वाढत आहेत. पण त्यातही प्रचंड विकृती आढळून येत आहेत. तीन दिवसांपूर्वी सिगारेट पिण्याला विरोध केला म्हणून एका रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारांनी प्रवासी दाम्पत्याला बेदम मारहाण केली. तर जळगाव रस्त्यावर एका आरोपीचा डोळे बाहेर काढून खून करण्यात आला होता. नारेगाव, जिन्सी व सिटी चौक परिसरातून मोठ्या प्रमाणात नशेचे पदार्थ विकले जातात. किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होते, पण यातले बडे मासे मोकाटच असल्याने वारंवार माध्यमांतून दर्शवले जात आहे. आता पोलीस या प्रकरणी पुढे काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

इतर बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ज्यांना डावललं त्यांना पुन्हा संधी; भाजपमध्ये नेमकं काय चाललंय?

नंदुरबार पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला, गुगल मॅपच्या मदतीने सराईत आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी जेरबंद

'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले
'ओ तुम्ही गाड्या घ्या ना, कलेक्टर..', अजितदादा वैतागले.
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा.
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.