औरंगाबादः माजी नगरसेवकाच्या भावाच्या गाडीत नशेच्या 260 गोळ्या! संशयित अटकेत

उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, अंमलदार देशराज मोरे यांच्या पथकाने अण्णा भाऊ साठे चौकात सापळा रचून गाडी अडवली. सय्यद मंजूरची तपासणी केली असता 13 स्ट्रीपमध्ये 260 गोळ्या आढळून आल्या.

औरंगाबादः माजी नगरसेवकाच्या भावाच्या गाडीत नशेच्या 260 गोळ्या! संशयित अटकेत
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 2:50 PM

औरंगाबादः शहरातील माजी नगरसेवक सय्यद मतीन (Sayyad Matin) यांच्या भावाची गाडी घेऊन जाणाऱ्या एका इसमाकडे नशेच्या 260 गोळ्या (बटण) आढळून आल्या. गुरुवारी शहरातील सिटी चौक पोलिसांनी (City Chauk Police station) अण्णा भाऊ साठे चौकात रात्री साठेआठ वाजता ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी सय्यज मंजूर (Sayyad Manjoor) या आरोपीला अटक केली आहे.

खबरींनी दिलेल्या माहितीवरून कारवाई

आरोपी कारमधून नशेच्या गोळ्या घेून जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना गुरुवारी मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, अंमलदार देशराज मोरे यांच्या पथकाने अण्णा भाऊ साठे चौकात सापळा रचून गाडी अडवली. सय्यद मंजूरची तपासणी केली असता 13 स्ट्रीपमध्ये 260 गोळ्या आढळून आल्या.

माजी नगरसेवक सय्यद मतीन यांच्या भावाची गाडी

अधिक माहिती घेतली असता आरोपी मंजूरकडे असलेली चारचाकी माजी नगरसेवक सय्यद मतीन यांचे भाऊ सय्यद मोसीन यांची असल्याचे समोर आले. मंजूरकडे त्यांची गाडी कशी आली, नशेच्या गोळ्यांसाठी त्याने ती काप वापरली, कुणाच्या सांगण्यावरून वापरली, यात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

इतर बातम्या-

ED च्या कारवाईने औरंगाबादेत खळबळ, उद्योजक-राजकारण्यांचे धाबे दणाणले, जालना-लातुरातही धाडसत्र

महापालिकेआधीच 14 बाजार समित्यांमध्ये निवडणुकीचे जंगी सामने; नाशिक जिल्ह्यात मतदार याद्या प्रसिद्ध!

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.