Aurangabad: जि.प. शाळेतही निवडणुकीचं नाट्य! ऐनवेळी 16 विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याची पालकांची मागणी, काय घडला प्रकार?

गाव पातळीवर, शाळेच्या व्यवस्थापनासाठी स्थापन होत असलेल्या या समितीच्या निवडणुकीलाही कुरघोडींचे रंग चढलेले दिसून येत असतात. औरंगाबादमधील अंबा गावात असाच प्रकार घडला.

Aurangabad: जि.प. शाळेतही निवडणुकीचं नाट्य! ऐनवेळी 16 विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याची पालकांची मागणी, काय घडला प्रकार?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 3:37 PM

औरंगाबादः जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात समन्वय स्थापन करण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक होत असते. मात्र गाव पातळीवर, शाळेच्या व्यवस्थापनासाठी स्थापन होत असलेल्या या समितीच्या निवडणुकीलाही कुरघोडींचे रंग चढलेले दिसून येत असतात. कन्नडमधील अंबा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत असाच एक प्रकार शुक्रवारी घडला.

शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक प्रतिष्ठेची!

अंबा गावात जिल्हा परिषदेची आठवीपर्यंत शाला आहे. शाळेत 89 विद्यार्थी, दोन शिक्षक, एक शिक्षिका आहे. शाळेत शनिवारी शालेय शिक्षण समितीची निवडणूक पार पडत आहे. मात्र शुक्रवारी निवडणुकीसाठी गावातील दोन गटात चढाओढ पहायला मिळाली. शुक्रवारी दुपारी 16 विद्यार्थ्यांचा टीसी घेऊन पालक हजर झाले. आजच प्रवेश देऊन उद्याच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क द्या, अशी मागणी त्यांनी केली. शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक या समितीसाठी मतदान करत असतात. मात्र पालकांच्या या मागणीवर मुख्याध्यापकांनी मुलांना प्रवेश देतो, मात्र उद्या मतदान करता येणार नाही, असे सांगितले.

शिक्षकांनाच डांबून ठेवले?

उद्या मतदान करता येणार नसल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितल्यावर संतप्त पालकांनी दोन्ही शिक्षकांना दुपारी तीन वाजता स्थानबद्ध केले. महिला शिक्षकांना फक्त घरी जाऊ दिले. सायंकाळपर्यंत मुख्याध्यापक आपल्या निर्णयावर ठाम होते. मात्र, तुम्ही जे म्हणता, ते लेखी द्या, अशी मागणी पालकांनी केली. लेखी पत्र दिल्यानंतर पालकांनी मुख्याध्यापकांना सोडून दिले.

इतर बातम्या-

Chandigarh Mayor|चंदीगडमध्ये जादूची कांडी फिरली; मुसंडी मारूनही ‘आप’ सत्तेपासून दूर, भाजपचा महापौर!

Breaking | मध्य रेल्वेच्या 36 तासांच्या जम्बो मेगा ब्लॉकला सुरुवात, थेट LIVE

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.