Railway| मनमाड ते औरंगाबाद रेल्वे विद्युतीकरणाचे काम नोव्हेंबरपर्यंत होणार, वेळ आणि खर्चात कसा फायदा ?
मनमाड ते नांदेड रेल्वेलाइनला विजेचा पुरवठा करण्यासाठी वैजापूरजवळील रोटेगाव स्थानकावर वीज टॉवरच्या उभारणीचे काम सुरु आहे. खंडोबानगर येवला रोड, वैजापूर येथून स्वतंत्र वीजलाइन टाकण्याचे काम सुरु आहे.
औरंगाबादः मनमाड ते नांदेड (Manmad – Nanded Railway) रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाची (Electrification) अनेक वर्षांपासून प्रतीक्षा सुरु आहे. विद्युतीकरणाचे काम झाल्यास इंधनात मोठी बचत होणार आहे. विद्युतीकरणाच्या या कामाने आता वेग घेतला आहे. सध्या मनमाड ते रोटेगावपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. एप्रिलअखेरपर्यंत परसोडा आणि नोव्हेंबर अखेरपर्यंत औरंगाबादचे (Aurangabad city) विद्युतीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहेत. या रेल्वेमार्गाला वीजपुरवठा करण्यासाठी रोटेगाव येथे 132 केव्ही सबस्टेशनची उभारणी केली जात आहे. मराठवाडा रेल्वे कृती समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी या कामाची पाहणी केली.
फायदा काय होणार?
सध्या नांदेडहून मुंबई आणि दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेंना मनमाडपर्यंत डिझेल इंजिन लावण्यात येते. त्यासाठी प्रति किलोमीटर 15 लीटरपेक्षा जास्त इंधन खर्च होते. विद्युतीकरणामुळे हा खर्च वाचेल. तसेच मनमाड येथे सध्या डिझेल इंजिन बदलून इलेक्ट्रिक इंजिन लावले जाते. त्यासाठी 30 ते 40 मिनिटांचा वेळ लागतो. विद्युतीकरणामुळे हा वेळही वाचेल व जास्त वेळ मनमाडला गाडी थांबवण्याची गरज पडणार नाही.
मराठवाड्याच्या रेल्वे विकास कामांची प्रगती काय?
– मनमाड ते मुदखेड दुहेरीकरणाची कामे मार्गी लागली आहेत. – जालना- खामगाव मार्गास मान्यता मिळाली आहे. – नगर-परळी-बीड मार्गावर 60 किमी रेल्वेची चाचणी पूर्ण झाली आहे. – आता मनमाड- ते नांदेड विद्युतीकरणाची कामेही वेगात सुरु असून 55 किमीपर्यंत प्रत्यक्ष खांब उभे करून विद्युत ताराही उभारण्यात आल्या आहेत.
रोटेगावला विद्युत टॉवर
मनमाड ते नांदेड रेल्वेलाइनला विजेचा पुरवठा करण्यासाठी वैजापूरजवळील रोटेगाव स्थानकावर वीज टॉवरच्या उभारणीचे काम सुरु आहे. खंडोबानगर येवला रोड, वैजापूर येथून स्वतंत्र वीजलाइन टाकण्याचे काम सुरु आहे. वैजापूर येवला रोड, चांगदाव, नांदगावमार्गे रोटेगावात वीज आणली जाईल. केपीटीएल व श्रीम इलेक्ट्रिकल्स या एजन्सीद्वारे वीजलाइन टाकण्याचे काम सुरु आहे.
इतर बातम्या-