Aurangabad crime: पानदरीबा भागात धाडसी चोरी, इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे शटर उचकटून अडीच लाखांचे साहित्य लंपास
सदर चोरीची माहिती मेहता यांनी सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. दरम्यान दुकानातील सीसीटीव्हीची पोलिसांनी पाहणी केली असता, त्यात एक चोरटा स्पष्टपणे दिसत आहे.
औरंगाबाद: शुक्रवारी पहाटे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पानदरिबा भागात धाडसी चोरी (Big theft in Aurangabad) झाल्याचे उघड झाले आहे. चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानाचे शटर उचकटून महागडे मोबाइल, अॅक्सेसरीज असा माल लंपास केला. ही चोरी करताना एक चोरटा सीसीटीव्ही फुटेजमझदध्ये कैद झाला आहे. या चोरीस जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचा माल चोरीला गेल्याची माहिती दुकानमालकांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात चोरी (Aurangabad theft) आणि घरफोडीचे सत्र सुरु आहे. सणासुदीच्या काळात अशा घटना घडू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
पुष्कर स्मार्ट प्लांट दुकानात चोरी
शहरातील पानदरिबा परिसरात प्रणव प्रमोद मेहता यांचे पुष्कर प्लांट नावाचे मोबाइल व मोबाइलसंबंधित अॅक्सेसरीज विक्रीचे दालन आहे. नेहमी प्रमामे त्यांनी गुरुवारी रात्री दुकान बंद केले आणि ते घरी गेले. शुक्रवारी सकाळी मात्र दुकानाच्या आजूबाजूच्यांना हे शटर उचकटलेले दिसून आले. शेजाऱ्यांनी मेहता यांना याबाबत माहिती दिली. दुकानात जाऊन त्यांनी पाहिले असता दुकानाचे समोरील भागातील शटर उचकटलेले होते. दुकानात ठेवलेले महागडे मोबाइल व इतर साहित्य लंपास करण्यात आले होते.
सीसीटीव्ही असल्याचे कळताच तो बंद केला
सदर चोरीची माहिती मेहता यांनी सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. दरम्यान दुकानातील सीसीटीव्हीची पोलिसांनी पाहणी केली असता, त्यात एक चोरटा स्पष्टपणे दिसत आहे. आपण सीसीटीव्हीत दिसत आहोत, हे कळताच त्याने तो बंद केला. त्यामुळे हा चोर सराइत चोर असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या परिसरात आणखीही काही दुकाने फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच्या चोरीतदेखील हा चोर सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे.
शहरात मंगळसूत्र चोरांचाही धुमाकूळ
दरम्यान, सणा-सुदीच्या पार्श्वभूमीवर महिलांची रस्त्यांवर वर्दळ वाढत असल्याने शहरातील सोनसाखळी चोरीचेही प्रमाण वाढले आहे. गुरुवारी पिरॅमिड चौक ते प्रोझोन मॉलकडे जाणाऱ्या एक मुलीच्या गळ्यातील चैन मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी हिसकावून घेतल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ही विद्यार्थीनी प्रचंड घाबरली. सदर घटनेची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना देण्यात आली आहे. मागील आठ दिवसात अशा तीन घटना घडल्या. यात सिडको, जाधववाडी परिसरातून मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
इतर बातम्या-