Exam Scam: पिंपरी चिंचवड पोलीस भरती कॉपी प्रकरणी औरंगाबादेतील पोलिसासह दोघे ताब्यात!
पिंपरी चिंचवड पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत कॉपी करणाऱ्या परीक्षार्थीला पकडण्यात आले होते. या प्रकरणी हिंजवडी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या तपासात औरंगाबादमधील सिटी चौक ठाण्याच्या एका पोलीस कॉन्स्टेबलसह त्याच्या मित्रालाही पोलिसांनी सोमवारी अटक केली.
औरंगाबादः पिंपरी चिंचवड पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत कॉपी करणाऱ्या परीक्षार्थीला पकडण्यात आले होते. या प्रकरणी हिंजवडी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या तपासात औरंगाबादमधील सिटी चौक ठाण्याच्या एका पोलीस कॉन्स्टेबलसह त्याच्या मित्रालाही पोलिसांनी सोमवारी अटक केली. भोईवाडा भागात ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या पोलीस कॉन्सेटबलच्या सासऱ्यांचीही पोलीस प्रशिक्षण अकॅडमी असल्याने येथे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
पिंपरी चिंचवडच्या 720 जागांसाठी 19 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शाहरातील 80 केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. दरम्यान, हिंजवडी येथील केंद्रावर आलेल्या उमेदवारांची तपासणी करताना एकाच्या मास्कचे वजन जास्त असल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे मास्कची बारकाईने तपासणी केली असता आत इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवल्याचे समोर आले. सदर आरोपीकडे ओळखपत्र मागितले असता त्याने बॅगेत विसरलेले ओळखपत्र आणण्याच्या बहाण्याने पळ काढला. आरोपीच्या मास्कमध्ये एक सिमकार्डदेखील आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी औरंगाबादेतील नितीन मिसाळ आणि रामेश्वर शिंदे यांना अटक केली होती. या प्रकरणी पुढील तपासात औरंगाबादमधील वैजापूरमधील गणेश वैद्यचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतेले. तसेच सिटी चौक ठाण्यातील पोलीस शिपाई राहुल गायकवाड याने डिव्हाइसमधून उत्तरे सांगितल्याचे समोर आले. मंगळवारी पहाटे पोलिसांनी त्याला अटक केली.
आरोपीच्या सासऱ्याची पोलीस प्रशिक्षण अकॅडमी
पोलीस भरती रॅकेटमध्ये औरंगाबादचे कनेक्शन समोर आले. त्यात पोलीसच सहभागी असल्याचे स्पषअट झाले. सिटी चौक पोलीस ठाण्यातून अटक करण्यात आलेला राहुल गायकवाड स्वतः काही महिन्यांपासून उपनिरीक्षक पदासाठी प्रयत्न करत होता. विशेष म्हणजे त्याच्या सासऱ्यांचीही पोलीस भरतीचे प्रशिक्षण देणारी अकॅडमी आहे. त्या अकॅडमीद्वारे पोलीस भरतीचे रॅकेट चालते का, याचा तपास पोलीस करणार आहेत.
इतर बातम्या-