थरकाप उडवणारा खून, नसा कापल्या, कान छाटले, डोक्यात हातोड्याचे वार, छातीवर बसून गळा चिरला, औरंगाबाद हादरलं!

औरंगाबाद: शहराला हादरवून टाकणारी अत्यंत क्रूर हत्या (Brutal Murder) रविवारी रात्री घडली. मात्र या हत्येतील घटनाक्रम आणि खून कसा झाला, याची माहिती उघड झाल्यानंतर अख्ख्या शहराला हादरा बसला आहे. शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन हरिभाऊ शिंदे यांची इतक्या क्रूरपणे हत्या केलीय की, ते ऐकतानाही मन सुन्न होतं. काय घडलं रविवारी रात्री? […]

थरकाप उडवणारा खून, नसा कापल्या,  कान छाटले, डोक्यात हातोड्याचे वार, छातीवर बसून गळा चिरला, औरंगाबाद हादरलं!
प्राध्यापकाच्या क्रूर हत्येने अवघं औरंगाबाद शहर हादरलं..
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 12:56 PM

औरंगाबाद: शहराला हादरवून टाकणारी अत्यंत क्रूर हत्या (Brutal Murder) रविवारी रात्री घडली. मात्र या हत्येतील घटनाक्रम आणि खून कसा झाला, याची माहिती उघड झाल्यानंतर अख्ख्या शहराला हादरा बसला आहे. शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन हरिभाऊ शिंदे यांची इतक्या क्रूरपणे हत्या केलीय की, ते ऐकतानाही मन सुन्न होतं.

काय घडलं रविवारी रात्री?

मुकुंदवाडी पोलिसात डॉ. राजन शिंदे यांच्या पत्नी डॉ.मनीषा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सिडको येथील संत तुकोबा नगरात डॉ. राजन शिंदे, मुलगी चैताली (20), मुलगा रोहित (17), सासरे हरिभाऊ आणि सासू चंद्रकला हे राहतात. रविवारी संध्याकाळी साडे नऊ वाजता घरातील सासू-सासरे, जेवण करून त्यांच्या खोलीत झोपी गेले. मुलगी, मुलगा जागेच होते. राजन हे मित्राला भेटण्यासाठी बाहेर गेले होते. रात्री साडे अकरा वाजता ते बाहेरून जेवण करून घरी आले. त्यानंतर पती-पत्नींनी रात्री एक वाजेपर्यंत टीव्ही पाहिला. मनीषा रात्री एक वाजता खोलीत झोपण्यासाठी गेल्या. मुलांनाही झोपायला सांगितले. पती राजन हे हॉलमध्ये टाकलेल्या अंथरुणावर पडून टीव्ही पाहत होते. पण मनीषा सकाळी सव्वा सहा वाजता उठून हॉलमध्ये आल्या, तेव्हा त्यांना डॉ. राजन हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या शेजारी मुलगा आणि मुलगी दोघेही नव्हते.

इतक्या क्रूरपणे मारलं की….

डॉ. राजन यांच्या मुलाने सकाळीच पोलिसांना या खूनाची माहिती दिली. त्याबरोबर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार राजन शिंदे यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर केलेले वार एवढे भयंकर होते की, एवढी क्रूरता कुणी केली असावी असा प्रश्न पडतो. पोलिसांच्या अंदाजानुसार.. – राजन शिंदे यांच्या दोन्ही हातांच्या मनगटाजवळील नसा कापल्या असाव्यात, त्याचे खोलवर घावही दिसत आहेत. – कपाळासह कानही चिरण्यात आला आहे. – एका घावात न चिरल्यामुळे कानावर अनेक घाव केल्याचे दिसत आहे. – डोक्यात हातोड्याचे वार केलेले दिसत आहेत. – दोन्ही हातांवर मारेकऱ्याने दोन्ही पाय ठेवून गळा चिरला असवा – डॉ. राजन शिंदे यांच्या छातीवर मारेकरी बसल्याच्या खुणाही आढळल्या आहेत.

पहाटे मुलाने आईला न सांगता थेट पोलीस स्टेशन गाठले….

डॉ. राजन शिंदे यांचा खून नेमका कुणी केला, याचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही. पण ही हत्या कुणीतरी निकटवर्तीयांनीच केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. – पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजन शिंदे यांचा मुलगा अलार्म लावून सकाळी साडे पाच वाजता उठला. त्याला हॉलमध्ये वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. – वडिलांना घेऊन जाण्यासाठी चार चाकी गाडी घराच्या पार्किंगमधून काढून मुलगा अँब्युलन्स घेऊन येण्यासाठी एका खासगी रुग्णालयात गेला. – रस्त्यात एका दुचाकीला धडक दिल्याने गाडी तेथेच सोडून तो जवळच्या खासगी रुग्णालयातील अँब्युलन्स घेऊन घरी आला. – मात्र अँब्युलन्सचालकाने ही पोलीस केस असल्यामुळे सेवा देण्यास नकार दिला. – अँब्युलन्स गेल्यानंतर मुलाने बहिणीला झोपेतून उठवले, मात्र तोपर्यंत आईला कल्पनाही दिली नाही. – मुलगा आणि मुलगी दोघेही चिश्तीया पोलीस चौकीत गेले. – तेथूनच 100 नंबरवर सकाळी 6 वाजता पोलिसांना घटनेची माहिती दिली. – त्यानंतर दोघेही घरी परतले, तोपर्यंत आई उठलेली होती. – काही वेळातच ही घटना वाऱ्यासारखी शहरभर पसरली.

खुनाभोवती असंख्य संशयास्पद घटना…

– पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शिंदे यांच्या घराचे सर्व दरवाजे आतून बंद होते. घरात त्यांच्यासह पत्नी, दोन मुले आणि आई-वडील होते. घरातील वस्तू चोरीला गेलेली नाही. दरवाजेही तोडण्यात आलेले नाहीत. – डॉ. शिंदे रक्ताच्या थारोळ्या पडल्यानंतर तत्काळ पोलिसांना बोलावले नाही. पोलीस येण्यापूर्वीच हॉलमध्ये सांडलेले रक्त पुसून घेण्यात आले. – बाहेरून कोणी आल्याच्या पावलांचे ठसेही आढळले नाहीत. – हॉल ते खोलीपर्यंतच एकाच्या तळपायाचे ठसे पाहणीत आढळले. – त्यामुळे हा गृह कलहातून घडलेला प्रकार असावा, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नसून लवकरच पोलिसांकडून गुन्ह्याचा उलगडा होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली.

इतर बातम्या –

तिरुपतीचे बनावट पास देणाऱ्या भामट्याला बेड्या, 61भाविक दर्शनाविनाच परतले होते औरंगाबादेत

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.