Aurangabad: शेतीच्या नुकसान भरपाईसाठी तरुणाचं जलसमाधी आंदोलन, औरंगाबादेतल्या सलीम अली सरोवरात उतरला तरुण
औरंगाबाद: सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे औरंगाबाद परिसरातील (Heave rain in Aurangabad) शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. मेहनतीने वाढवलेली पिकं हाता-तोंडाशी आली असताना आसमानी संकटानं सारं काही हिरावून नेलं. मात्र सरकरानं अद्याप नुकसान भरपाईसाठी कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं (Farmer agitation) वातावरण आहे. यातूनच औरंगाबादमधील एका शेतकऱ्याने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मंगळवारी जलसमाधी आंदोलन […]
औरंगाबाद: सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे औरंगाबाद परिसरातील (Heave rain in Aurangabad) शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे. मेहनतीने वाढवलेली पिकं हाता-तोंडाशी आली असताना आसमानी संकटानं सारं काही हिरावून नेलं. मात्र सरकरानं अद्याप नुकसान भरपाईसाठी कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचं (Farmer agitation) वातावरण आहे. यातूनच औरंगाबादमधील एका शेतकऱ्याने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मंगळवारी जलसमाधी आंदोलन केलं.
सलीम अली सरोवरात उतरला तरुण
अतिवृष्टीमुळे शेतीचे जे नुकसान झाले आहे, त्याची सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी औरंगाबादमधील तरुणाने सलीम अली सरोवरात जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे येथील पाण्याची पातळीही वाढलेली आहे. शेतीची नुकसान भरपाई नाही मिळाली तर विष प्राशन करून जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही या तरुणाने दिला. पुढील दोन दिवसाच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, अन्यथा विष प्राशन करुन घेणार असल्याचा इशारा तरुणाने दिला.
मराठवाड्यात 25 लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान
मराठवाड्यात मागील चार महिन्यांत सर्वाधिक पावसामुळे कमीत कमी 91 जणांचा मृत्यू झाला तर 25 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, मराठवाड्यात मान्सूनच्या काळात होणाऱ्या एकूण 679.5 मिलीमीटर पावसाच्या तुलनेत या वर्षी 1,041.5 मिलीमीटर पाऊस झाला.
विमा तक्रार भरल्याशिवाय भरपाई नाही
पावसामुळे विदर्भासह मराठवाड्यातील (Marathwada) खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पंचनामे करण्याची प्रक्रीया सुरु असली तरी शासनाच्या एका निर्णयामुळे नुकसानीच्या दाव्यांमध्ये देखील वाढ झालेली आहे. ज्या भागातील सर्व्हेक्षण यापुर्वी झालेले आहे अशा भागात पुन्हा सर्व्हेक्षण होणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे. त्यामुळे (Panchnama) पंचनामे नंतर झालेल्या नुकसानीचे काय असा सवाल आता शेतकऱ्यांसमोर आहे. याच धास्तीने शेतकरी आता पीक विमा तक्रारींवर भर देत आहे. नुकसानीनंतर उत्पादनापेक्षा पीकविमा मदतीचाच हातभार मिळणार असल्याने आता तक्रार दाखल करण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलेले आहे. ऑगस्ट पहिल्या आठवड्यापासून मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये पावसाने लावलेली हजेरी आजही कायम आहे. त्यामुळे सोयाबीन, उडीद तसेच सर्वच पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना स्व:ताच मोबाईलद्वारे नुकसानीचा दावा करावा लागत आहे. तर दुसरीकडे पंचनामे करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकारी- कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येतही होते. मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि हिंगोली या जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाल्याचा अहवालही विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सपूर्द करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही मराठवाड्यात पावसाने थैमान घातलेले होते. पंचनामे केल्यानंतर झालेल्या नुकसानीचे काय असा सवालही उपस्थित करण्यात आला होता. मात्र, एकदा सर्व्हेक्षण झाले की त्या भागात पुन्हा सर्व्हेक्षण होणार नाही अशी भुमिका प्रशासनाची आहे. त्यामुळे शेतकरीच आता नुकसानीचे दावे करण्यात गुंग आहे. मोबाईलद्वारे तक्रार दाखल झाल्यास विमा कंपनीकडून तरी मदत मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्यातून आता तक्रारीचा आकडा हा वाढत आहे.
इतर बातम्या-