Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: चिकलठाणा ते वाळूज उड्डाणपूलः डीपीआरचा प्रस्ताव दिल्लीत दाखल, अंदाजे 2 हजार कोटींचे बजेट!

औरंगाबादमधील बहुचर्चित चिकलठाणा ते वाळूज या उड्डाणपूलाच्या बांधकामाविषयीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. या उड्डाणपुलासाठी 2 हजार कोटी रुपयांचा खर्च होईल, असा अंदाज आहे.

Aurangabad: चिकलठाणा ते वाळूज उड्डाणपूलः डीपीआरचा प्रस्ताव दिल्लीत दाखल, अंदाजे 2 हजार कोटींचे बजेट!
वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी नागपूरमध्ये बांधलेल्या या उड्डाणपूलाच्या धर्तीवर औरंगाबादेत पूल बांधण्याचा प्रस्ताव आहे.
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 12:21 PM

औरंगाबादः वाळूज ते चिकलठाणा हा तब्बल 20 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल (Aurangabad fliover) उभारण्याचे वक्तव्य पुन्हा एकदा नितीन गडकरी यांनी लातूरमध्ये केलं. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) रस्ते विकासाच्या कामांच्या शुभारंभ कार्यक्रमात भाषण करत होते, त्यावेळी त्यांनी औरंगाबादमधील बहुचर्चित उड्डाणपूलाचा आवर्जून उल्लेख केला. केंद्रीय दळणवळण खात्याकडे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (NHAI) स्थानिक प्रकल्प कार्याललयातून या पुलासाठीचा प्रस्ताव ऑक्टोबर 2021 मध्ये पाठवण्यात आला आहे. तसेच या पुलासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा डीपीआर तयार केला जाणार असल्याची माहितीही नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.

औरंगाबादचे रुप बदलणारा बहुचर्चित पूल

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये चिकलठाणा ते वाळूज या उड्डाणपूलाची चर्चा आहे. हा पूल झाला तर वाळूज ते डीएमआयसी परिसरातील सर्व उद्योग वसाहती परस्परांशी जोडल्या जातील. दळणवळणाचा मोठा ताण कमी होईल. नाशिक, नागपूरमध्ये अशा पुलांची उभारणी झाली आहे. त्याच धर्तीवर औरंगाबादमध्ये पूल उभारल्यास औद्योगिक नगरी औरंगाबादचे रूप पूर्णतः पालटेल.

डीपीआर मंजुरीनंतर काय प्रक्रिया?

20 किलोमीटर लांबीचा पूल उभारणीसाठीचा डीपीआर मंजुरीनंतर पुलासाठी किती जागा लागेल, याची पाहणी होईल. किती मालमत्ता बाधित होतील, याचा सर्वेक्षण अहवाल तयार केला जाईल. या सर्व तांत्रिक बाबींचा नव्याने अहवाल तयार करून तो पुन्हा एकदा मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे जाईल.

अडचण कुठे कुठे?

औरंगाबादच्या मध्यवर्ती असलेल्या जालना रोडवर 20 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाचे स्वप्न दाखवले जात आहे. मात्र यातही अनेक अडचणी आहेत. याआधीच जालना रोडवर अनेक पूल आहेत. त्यात छावणी, महावीर चौक, क्रांती चौक, मोंढा नाका, सेव्हन हिल्स, सिडको आदी उड्डाण पुलांचा समावेश आहे. या पुलांवर जवळपास 200 कोटींच्या आसपास खर्च झाला आहे. नव्याने उड्डाणपूल बांधल्यास एवढा खर्च पाण्यात जाणार का, असा प्रश्न आहे. तसेच विमानतळासमोरदेखील एका उड्डाणपूलास मंजूरी मिळाली आहे. 20 किमीच्या एकाच पुलाची घोषणा केल्यामुळे त्या पुलाचे काय होणार, हाही प्रश्न आहे.

इतर बातम्या-

चंद्रकांतदादांना हटवायचं की फडणवीसांना हटवायचं?, भाजपमध्ये खदखद, घरवापसीचा कार्यक्रम लवकरच; नवाब मलिकांचा दावा

Pm modi : हिवाळी अधिवेशनाच्या आधी मोदींनी बोलवली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, या मुद्द्यावर होणार बैठकीत चर्चा…

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.