ऐसे फस गए जाल में… चोरीचा माल विक्रीसाठी गेल्या अन् औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात फसल्या

वाळूजच्या कंपनीत घटनेच्या दिवशी मध्यरात्री काही महिला चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेऊन संशयित महिला चोरांचा वाळूज औद्योगिक परिसरात शोध सुरु केला होता.

ऐसे फस गए जाल में... चोरीचा माल विक्रीसाठी गेल्या अन् औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात फसल्या
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 2:44 PM

औरंगाबाद: शहरातील वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC) येथील एका कंपनीत चोरी केलेले साहित्य भंगाराच्या दुकानात विक्रीसाठी गेलेल्या चार महिला चोरांना सोमवारी वाळूज पोलिसांनी   (Aurangabad police)सापळा रचून जेरबंद केले. या चार महिलांकडून 30 हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

13 ऑक्टोबरला झाली होती चोरी

संदीप भीमराव साळवे यांची वाळूज एमआयडीसीतील के सेक्टरमध्ये पूजा एंटरप्रायजेस कंपनी आहे. 13 ऑक्टोबरला मध्यरात्री चोरट्यांनी या कंपनीतून लोखंडी अँगल, चॅनल, शीट आदींसह जवळपास 30 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले होते. या घटनेनंतर त्यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला.

चोरीच्या रात्री सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला

पोलिसांच्या तपासानुसार, या कंपनीत घटनेच्या दिवशी मध्यरात्री काही महिला चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेऊन संशयित महिला चोरांचा वाळूज औद्योगिक परिसरात शोध सुरु केला होता.

असा रचला सापळा

कंपनीतील चोरीचा माल विक्री करण्यासाठी त्या महिला सोमवारी सकाळी पंढरपूरमधील एका भंगार विक्रीच्या दुकानात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मनसे चौकात सापळा रचला. सकाळी साडेआठच्या सुमारास संशयित चार महिला माल घेऊन येत असल्याचे दिसताच पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी सुशीला घुले, कमल सरोदे, अरुणा कसबे, मंगल अहिरे या चार महिलांनी गुन्ह्याची कबूली दिली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

बाणेगावमध्ये ३७ हजारांची दारू पकडली, १ जण फरार

अन्य एका घटनेत बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील बाणेगाव येथे अंबाजोगाईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी छापा मारून 37  हजार 440  रुपयांची गोवा राज्यातील निर्मित दारू पकडली. तर दारूचा साठा करणारी व्यक्ती फरार असून त्यांचा शोध आहे. बाणेगाव येथील विलास चंद्रकांत मोराळेंच्या शेतातील गोठ्यात गोवा राज्यातील निर्मित दारूचा साठा करून ठेवल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यावरून औरंगाबादचे राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त पवार व बीडचे अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनात दुय्यम निरीक्षक आर. के. बागवान, अरुण खाडे, सहायक दुय्यम निरीक्षक सादिक सय्यद, रुपसिंग जारवाल, श्रीराम धस, राम डुकरे, अशोक शेळके, मस्के यांच्या पथकाने मंगळवारी छापा मारला. गोठ्यात ऑफिसर चॉइस व्हिस्की दारूच्या 180 मिलीच्या 288  बाटल्यांचे 6 बॉक्स आढळला असून पथकाने हा 37  हजार 440  रुपयांचा दारू साठा जप्त केला. एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. कुणी अवैद्य मद्यनिर्मिती व विक्री करत असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन बीडचे अधीक्षक नितीन घुले यांनी केले.

इतर बातम्या-

पुण्यातील उच्चशिक्षित कुटुंबात वाद, शिक्षणासाठी पैसे मागितल्याने बायकोला विहिरीत ढकललं

पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर चाकूहल्ला, भररस्त्यात हत्याकांड, नाशकात चाललंय काय?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.