FRAUD: बँकेत गहाण ठेवलेले 7 प्लॉट परस्पर विकले, औरंगाबादेत सेंट्रल बँक ऑफ इंडियाची अडीच कोटींची फसवणूक

बँकेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, विविध योजनेअंतर्गत बँकेकडून कर्ज घेण्यासाठी वाळूजचे व्यावसायिक बाळासाहेब तात्याराव पाथ्रीकर यांनी पत्नीच्या नावावरील सात प्लॉट गहाण ठेवले होते. हे प्लॉट परस्पर विकल्याचे बँकेच्या निरिक्षणात आले आहे.

FRAUD: बँकेत गहाण ठेवलेले 7 प्लॉट परस्पर विकले, औरंगाबादेत सेंट्रल बँक ऑफ इंडियाची अडीच कोटींची फसवणूक
औरंगाबादमध्ये बँकेत गहाण ठेवलले प्लॉट परस्पर विकल्याचे प्रकरण उघडकीस
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 11:26 AM

औरंगाबादः वाळूज येथील एका व्यवसायिकाने बँकेत (Bank fraud ) कर्जासाठी ठेवलेले गहाण ठेवलेले प्लॉट परस्पर विकून फसवणूक केल्याचा आरोप बँकेने केला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची (Central Bank Of India) या प्रकरणात 2 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप बँकेने केला आहे. कर्जाच्या खात्यांचे नूतनीकरण करताना, गहाण मालमत्तांचे निरीक्षण सुरु असताना उघड झाला, असे बँकेने तक्रारीत म्हटले आहे. सदर व्यावसायिकाविरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात (Kranti Chauk Police station) गुन्हा दाखल करण्यता आला आहे.

त्रिमूर्ती सिमेंटच्या व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

बँकेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, विविध योजनेअंतर्गत बँकेकडून कर्ज घेण्यासाठी वाळूजचे व्यावसायिक बाळासाहेब तात्याराव पाथ्रीकर यांनी पत्नीच्या नावावरील सात प्लॉट गहाण ठेवले होते. पाथ्रीकर यांचा त्रिमूर्ती सिमेंट प्रॉडक्ट्स नावाने व्यवसाय आहे. त्यांनी बँकेकडे 2021 मध्ये कर्जाची मगणी केल्यानंतर 80 लाख रुपये टर्म लोन व 40 लाख कॅश क्रेडिट म्हणून दिले. त्यांनी मालकीचे वडगाव औद्योगिक वसाहतीमधील सात प्लॉट व कचनेर रस्त्यावरील 81 आर क्षेत्रफळ गहाण ठेवले होते. त्यांनी 2014 मध्ये त्रिमूर्ती एंटरप्राइझेस फर्मसाठी कॅश क्रेडिट 1 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले. 2016 मध्ये त्यांनी पत्नीसह त्रिमूर्ती सिमेंट प्रॉडक्ट सुरु केले. त्यासाठी बँकेच्या क्रांती चौक शाखेत करंट खाते उघडले. बँकेने कॅश क्रेडिट 2 कोटी 20 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. कोरोना काळात सीजीईसीएल योजनेअंतर्गत उद्योगांना चालना देण्यासाठी बँकेने योजना काढली होती. त्यानंतर पुन्हा 20 टक्के टर्म लोनसाठी अर्ज करून त्यांनी 44 लाख रुपये अतिरिक्त कर्ज घेतले.

खोटी कागदपत्रे दाखवून कर्ज, 2 कोटींची फसवणूक

बँकेच्या वकील अॅड. सीमा राजपूत यांनी गहाण मालमत्तेची पाहणी केली. ओव्हरड्राफ्ट अकाउंटचे नूतनीकरण बाकी असल्याने ही प्रक्रिया करणे आवश्यक असते. त्यात पाथ्रीकर यांनी गहाण ठेवलेली वडगाव कोल्हाटी येथील मालमत्तेची बँकेच्या संमतीविना विक्री केल्याचे समोर आले. हे प्लॉट खरेदी केलेल्या लोकांनी त्यावर बांधकामदेखील सुरु केले. अशा प्रकारे पाथ्रीकर यांनी स्वतःच्या मालकीची कागदपत्रे सादर करून बँकेची एकूण 2 कोटी 64 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

इतर बातम्या-

अर्जुन खोतकरांवरची कारवाई शिवसैनिकांच्या जिव्हारी, जालन्यात ED च्या मदतीने शिवसेनेचा ‘गेम’ केल्याची भावना

धक्कादायक: 2 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून कपाटात कोंडले, नागरिकांच्या हाती लागताच चांगलाच चोपला, औरंगाबादची घटना

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.