सराफा बाजारात आता दिवाळी अन् लग्नसराईची लगबग, सोन्याच्या दरांत वाढ, वाचा औरंगाबादचे भाव
औरंगाबाद: दसरा, नवरात्रात साधारण स्थिर असलेल्या सोन्याच्या भावांनी (Gold Price) आता वाढीच्या दिशेने प्रवास सुरु केलेला दिसत आहे. चांदीच्या दरातही (Silver price) काहीशी वाढ होताना दिसत आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर औरंगाबादकरांनी आपट्यांच्या सोन्यासोबतच खऱ्या सोन्याचीही उत्साहाने खरेदी केली. आता सराफा बाजारात (Aurangabad sarafa market) दिवाळीसाठीची लगबग सुरु झाली आहे. औरंगाबादच्या सराफा बाजारातही दिवाळीनिमित्त विशेष दागिन्यांची […]
औरंगाबाद: दसरा, नवरात्रात साधारण स्थिर असलेल्या सोन्याच्या भावांनी (Gold Price) आता वाढीच्या दिशेने प्रवास सुरु केलेला दिसत आहे. चांदीच्या दरातही (Silver price) काहीशी वाढ होताना दिसत आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर औरंगाबादकरांनी आपट्यांच्या सोन्यासोबतच खऱ्या सोन्याचीही उत्साहाने खरेदी केली. आता सराफा बाजारात (Aurangabad sarafa market) दिवाळीसाठीची लगबग सुरु झाली आहे. औरंगाबादच्या सराफा बाजारातही दिवाळीनिमित्त विशेष दागिन्यांची आवक केली जाणार आहे.
औरंगाबादेत आजचे भाव
शहरातील सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचे दर 47,450 रुपये प्रति तोळा असे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 48,300 रुपये प्रति तोळा एवढे दिसून आले. मागील दोन दिवसांच्या तुलनेत हे दर 100-200 रुपयांनी वाढल्याचे चित्र दिसले. चांदीचे दरही काही प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे. औरंगाबादेत एक किलो शुद्ध चांदीचे दर 66500 रुपये एवढे नोंदले गेले, अशी माहिती औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलीक यांनी दिली.
लग्नसराईची चाहूल, दागिन्यांची ऑर्डर
दिवाळीनंतर लग्नसराईची सुरुवात होते. यामुळे आतापासूनच लग्नासाठीच्या दागिन्यांची ऑर्डर देण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहेत. अनेकजण दिवाळीपूर्वीच आपल्या पसंतीप्रमाणे दागिन्याच्या डिझाइनची मागणी सराफ्यांकडे करत असतात. त्यानुसार ग्राहकांना हव्या त्या डिझाइनमध्ये दागिना दिला जातो. त्यामुळे दिवाळीनंतर ज्यांचे लग्न ठरले आहेत, त्यांनी आतापासूनच सराफ्यांकडे ऑर्डर द्यायला सुरुवात केली आहे, अशी माहितीही सराफा व्यापाऱ्यांनी दिली आहे.
सोन्याची किंमत 60 हजार रुपयांपर्यंत जाणार
दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.
भारतात गोल्ड एक्सचेंज उभारणार
बाजार नियामक सेबीने बुधवारी गोल्ड एक्सचेंज उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गोल्ड एक्सचेंजमध्ये सोन्याचा व्यापार इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (पावती) अर्थात ईजीआरद्वारे केला जाईल. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (EGR) कोणत्याही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा नवीन स्टॉक एक्सचेंजमधून सुरू केली जाईल. सेबीच्या मंजुरीनंतरच हे ठरवले जाईल की, ईजीआरची किमान किंमत किती असेल. यानंतर शेअर बाजार EGR चे सोन्यात रूपांतर करू शकतील. सेबीच्या मते, गोल्ड एक्स्चेंजमध्ये EGR च्या ट्रेडिंग आणि फिजिकल सोन्याच्या डिलिव्हरीसाठी संपूर्ण इको-सिस्टम असेल आणि देशातील सोन्याच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता आणि निवड प्रदान करेल. ईजीआरच्या खरेदी आणि विक्रीसाठी गोल्ड एक्सचेंज हे राष्ट्रीय व्यासपीठ असेल. ईजीआरअंतर्गत मानक सोन्याचा व्यापार केला जाईल आणि देशभरात सोन्याची एकसमान किंमत रचना तयार करण्यात मदत होईल.
इतर बातम्या-
Gold Rate India Today : सोन्याचे भाव वाढले, चांदीही महाग; पटापट तपासा नवी किंमत