आहे मौका तर मारा चौका… सोने-चांदीचे भाव कोसळले, काय आहेत औरंगाबादचे आजचे भाव?
औरंगाबाद शहरातील सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचे दर 46050 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. तर शुद्ध चांदीचे दर 63800 रुपये प्रति किलो एवढे नोंदवले गेले.
औरंगाबाद: भारतीय शेअर बाजाराच्या आठवड्यातील पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरातील घसरण कायम राहिलेली दिसून आली. मागील आठड्यात सोने-चांदीच्या दरांनी सतत उतरता आलेख (Fall in Gold And Silver Rate) दर्शवला होता. त्याच धर्तीवर आठवड्यातील ट्रेंडही दिसून येत आहेत. दिल्ली आणि मुंबईतील सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे औरंगाबादच्या दरातही तोच ट्रेंड दिसून आला. मात्र ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात देशांतर्गत सोने खरेदी आणि औद्योगिक क्षेत्रातील सोने (Industrial Gold) खरेदीत मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या दरापेक्षा सोने आणि चांदीला चांगले भाव मिळू शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
औरंगाबादमधील सोन्या-चांदीचे दर
औरंगाबादमधील सोन्या-चांदीच्या दरात सोमवारीही घट दिसून आली. शहरातील सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचे दर 46050 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. तर शुद्ध चांदीचे दर 63800 रुपये प्रति किलो एवढे दिसून आले. अर्थात शेअर मार्केटमधील चढ-उतारांनुसार दर मिनिटाला सोन्या-चांदीचे दर बदलत असतात. उपरोक्त नोंदवण्यात आलेले दर हे दुपारी 2 वाजेच्या आसपासचे आहेत, अशी माहिती औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली.
मिस्डकॉल देऊन जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर
इब्जा अर्थात India Bullion and Jewellers Association च्या माध्यमातून सोने आणि चांदीचे सध्याचे दर पाहता येतात. तसेच या असोसिएशनने जारी केलेल्या 8955664433 या क्रमांकावर मिस्डकॉल देऊन 22 कॅरेट आणि 18 कॅरेट ज्वेलरीचे दर जाणून घेता येतात. या क्रमांकावर मिसकॉल दिल्यास काही सेकंदात आपल्याला दरांविषयी टेक्स्ट मॅसेज येतो. तसेच भारतीय सराफा बाजारातील अपडेट माहिती जाणून घेण्यासाठी www.ibja.co किंवा ibjarates.com या वेबसाइटलाही भेट देता येईल.
कुठे आहेत सोन्याच्या खाणी?
भारतातील सर्वात जास्त सोन्याचे उत्पादन कर्नाटक राज्यात (हुट्टी आणि ऊटी खाणींमधून) आणि आंध्र प्रदेश आणि झारखंडच्या काही भागांमध्ये (हिराबुद्दीनी आणि केंद्रुकोचा खाणींमधून) होते. सोने सामान्यतः स्वतंत्र किंवा पारा किंवा चांदीच्या मिश्रधातू म्हणून आढळते. बहुतांश सोन्याचे धातू खुल्या खड्ड्यांमधून किंवा भूमिगत खाणींमधून येतात. खडकांमधून धातूच्या स्वरूपात कामगार सोने काढतात. कार्बन पल्स प्लांटमध्ये खाणीचे दगड आणि त्याच्या पावडरवर प्रक्रिया केली जाते; त्यावर पोटॅशियम सायनाईड टाकून 48 तास ठेवले जाते. सायनाइडसह रासायनिक अभिक्रियेनंतर भंगारात दडलेले सोने द्रव स्वरूपात बाहेर येते. खडकाच्या तुकड्यावर सोने चमकते. सोन्याच्या धातूपासून शुद्ध सोने मिळवण्याच्या सर्व पद्धतींमध्ये, प्रथम खडकांमधून काढलेले धातू धुतले जाते आणि नंतर ते मिलमध्ये पाठवले जाते. मिलमध्ये, धातू पाण्यासह लहान कणांमध्ये ग्राईंड केले जाते. यानंतर, धातूला पाऱ्यासह प्लेट्समधून काढले जाते.
इतर बातम्या-
मोठी संधी! सोन्याची किंमत 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा दर
पुण्यात 1.2 कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला, लहान मुलासह आलेल्या दोन महिलांकडून चोरी