सोन्याच्या दरात पुन्हा घट, दिवाळीपर्यंत वाढण्याची शक्यता, वाचा औरंगाबादचे भाव

औरंगाबादः दसऱ्याच्या मुहूर्तावर औरंगाबादकरांनी सराफा बाजारात  (Aurangabad sarafa market)चांगलीच गर्दी केली होती. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या निमित्ताने (Dussehra occasion ) ग्राहकांनी आपट्याच्या पानांसोबतच खरे सोनेही लुटले. आता सोने खरेदीचा हा ट्रेंड दिवाळीपर्यंत चालणार असून सध्या तरी सोन्याचे भाव फार वाढलेले नाहीत, असे चित्र आहे. दोन दिवसांच्या तुलनेत सोन्याचे भाव काहीसे घसरल्याचे चित्र आहे तर […]

सोन्याच्या दरात पुन्हा घट, दिवाळीपर्यंत वाढण्याची शक्यता, वाचा औरंगाबादचे भाव
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 5:25 PM

औरंगाबादः दसऱ्याच्या मुहूर्तावर औरंगाबादकरांनी सराफा बाजारात  (Aurangabad sarafa market)चांगलीच गर्दी केली होती. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या निमित्ताने (Dussehra occasion ) ग्राहकांनी आपट्याच्या पानांसोबतच खरे सोनेही लुटले. आता सोने खरेदीचा हा ट्रेंड दिवाळीपर्यंत चालणार असून सध्या तरी सोन्याचे भाव फार वाढलेले नाहीत, असे चित्र आहे. दोन दिवसांच्या तुलनेत सोन्याचे भाव काहीसे घसरल्याचे चित्र आहे तर चांदीच्या भावात काहीशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

औरंगाबादचे भाव काय?

औरंगाबादच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 22 कॅरेट सोन्याचे दर 47,200 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 65,000 रुपये एवढे झाले, अशी माहिती औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सराफ यांनी दिली. विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी 22 कॅरेट सोन्याचे दर 47,800 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे दर 49,500 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. औरंगाबादमध्ये एक किलो शुद्ध चांदीचे दर आज 64,800 रुपये एवढे होते. दिवाळीपर्यंत सोन्याचे दर आणखी वाढणार असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

हॉलमार्क कसा ओळखालं?

सोन्याच्या हॉलमार्कमध्ये बीआयएसचे त्रिकोणी चिन्ह असते. तसेच, त्यावर हॉलमार्किंग केंद्राची एक खूण असते. त्यासोबतच सोन्याची शुद्धता, तो सोन्याचा दागिना कधी बनवला आहे, हे देखील त्यावर लिहिलेले असते.

सोने आणि दागिन्यावर बीआयएसची हॉलमार्किंग 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यावर केली जाते. हॉलमार्किंगमध्ये चार गोष्टींचा समावेश आहे. ज्यामध्ये बीआयएसचा मार्क, शुद्धता सारखे 22 कॅरेट आणि 916, असेसिंग सेंटरची ओळख आणि सराफांच्या ओळखीचे चिन्ह याचा समावेश असणार आहे.

दागिन्यांवर शुद्धतेचे प्रमाणपत्र

प्रत्येक दागिने किंवा नाण्यावर त्याची शुद्धता लिहिलेली असते. 99 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले आहे. तर 22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 आणि 21 कॅरेट सोन्याचे 875 असे लिहिलेले असते. या व्यतिरिक्त 18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 आणि 14 कॅरेट दागिन्यांवर 585 असे लिहिलेले असते.

हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करा

जर एखाद्या व्यापाऱ्याने हॉलमार्कऐवजी स्वस्त दागिने देण्याची ऑफर दिली असेल तर ती ऑफर स्विकारु नका. तज्ञांच्या मते, प्रत्येक दागिन्यांवर हॉलमार्क करण्याची किंमत केवळ 35 रुपये असते. म्हणजेच, हॉलमार्क केलेले आणि नॉन-हॉलमार्क असलेल्या दागिन्यांच्या किंमतीत सहसा कोणताही फरक नसतो. पण हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या शुद्धतेबाबत गडबड असू शकते.

कोणतेही दागिने घेताना त्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र आवर्जून घ्या. त्यात सोन्याची गुणवत्ता लिहिली आहे की नाही हे तपासा. तसेच त्या दागिन्यांमध्ये काही रत्ने जोडलेले असल्यास त्याचे प्रमाणपत्र आवश्यक घ्या.

हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करण्याचे बरेच फायदे आहेत. त्यातील एक म्हणजे सोन्याच्या शुद्धतेसह अडथळा येण्याची शक्यता कमी असते. तसेच जर तुम्ही दागदागिने विकायला गेलात तर त्यामध्ये कोणतेही डेप्रिसिएशन कॉस्ट कमी केली जात नाही. म्हणजेच तुम्हाला सोन्याची योग्य किंमत मिळेल.

इतर बातम्या

Gold-Silver Weekly Updates : या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ, सोन्याने केला 48 हजाराचा टप्पा पार

दसऱ्याला खरे सोने लुटताय ना? नव्या गोकाक कलेक्शनची महिलांना भुरळ, वाचा औरंगाबादचे भाव

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.