Aurangabad Gold: सोन्यासोबत चांदीचीही जोरदार घसरगुंडी, चांदीचे भाव आठ महिन्यांतील निचांकी स्तरावर

औरंगाबाद: आज सकाळपासून सुरु झालेल्या शेअर बाजारातील हालचालींमुळे सोने आणि चांदीच्या  (Gold and silver rate)दरांवरही चांगलाच परिणाम झालेला दिसून आला. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे काल काहीशी सुधारणा घेणारे सोन्याचे भाव पुन्हा घसरणीवर आल्याचे दिसून आले. त्यातच चांदीच्या दरातही जास्त घट झालेली दिसून आली. राष्ट्रीय बाजाराचे परिणाम म्हणून औरंगाबादच्या सराफा (Aurangabad sarafa market) बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात […]

Aurangabad Gold: सोन्यासोबत चांदीचीही जोरदार घसरगुंडी, चांदीचे भाव आठ महिन्यांतील निचांकी स्तरावर
सोन्यात गुंतवणूक
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 5:30 PM

औरंगाबाद: आज सकाळपासून सुरु झालेल्या शेअर बाजारातील हालचालींमुळे सोने आणि चांदीच्या  (Gold and silver rate)दरांवरही चांगलाच परिणाम झालेला दिसून आला. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे काल काहीशी सुधारणा घेणारे सोन्याचे भाव पुन्हा घसरणीवर आल्याचे दिसून आले. त्यातच चांदीच्या दरातही जास्त घट झालेली दिसून आली. राष्ट्रीय बाजाराचे परिणाम म्हणून औरंगाबादच्या सराफा (Aurangabad sarafa market) बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात घट दिसली.

औरंगाबादमध्ये सोने काय भाव?

औरंगाबादच्या सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचे दर 45700 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. कालच्या पेक्षा आजच्या सोन्याच्या दरात शंभर रुपयाची घट दिसून आली. तर चांदीच्या दरातही तब्बल हजार रुपयांची घट दिसून आली. आज एक किलो शुद्ध चांदीचे भाव 62800 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले.

चांदी आठ महिन्यांतील निचांकी स्तरावर

सराफा मार्केटमध्ये आज चांदीच्या दरांनी मोठी घसरण अनुभवली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने आणि चांदीच्या दरांना घसरण लागली होती. मात्र आज गुरुवारी 30 सप्टेंबर रोजी झालेली ही घट म्हणजे मागील आठ महिन्यांतील निचांकी स्तर असल्याची माहिती, औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली.

सराफा मार्केटला आता वेध नवरात्रोत्सवाचे

सध्या पितृपक्ष सुरु असल्यामुळे ग्राहक सोने-चांदीसारख्या मौल्यवान वस्तू या काळात खरेदी करणे टाळतात. त्यामुळे साहजिकच या पंधरा दिवसात सराफा बाजार मंदावलेला असतो. यातच मागील तीन दिवस औरंगाबाद शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजारपेठ जूण रिकामी होती. आता पावसाचा जोर ओसरला असून सराफा बाजाराला आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. तसेच मराठवाड्यात सर्वदूर पाऊस पडल्यामुळे ग्राहकांमध्येही उत्साही वातावरण असेल, अशी आशा सराफा बाजाराला आहे.

HUID म्हणजे काय?

केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंगचा एक युनिक आयडी असेल, ज्याला तांत्रिक भाषेत हॉलमार्किंग युनिक आयडी किंवा एचयूआयडी म्हणून ओळखले जाईल. HUID (गोल्ड हॉलमार्क युनिक आयडी) हा एक नंबरसारखा आहे, जो तुमच्या आधार किंवा पॅन सारखा असू शकतो. HUID अंतर्गत प्रत्येक दागिन्यांना एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो. हा आयडी सांगेल की, दागिने कोठून विकले गेले आणि विकल्यानंतर ते कोणाच्या हातात गेले. कोणत्या सोनाराने हे दागिने विकले, कोणत्या खरेदीदाराने ते विकत घेतले, ते दागिने काही लॉकरमध्ये ठेवले होते, ते वितळले गेले आणि पुन्हा दागिने बनवले गेले आणि पुढे विकले गेले. ही सर्व माहिती त्या HUID मध्ये नोंदवली जाईल.

इतर बातम्या

तस्कराने चक्क शरीराच्या ‘या’ भागात लपवली सोन्याची पेस्ट, कल्पनेच्याही पलिकडे

Gold Price Today: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोनं स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.