Gold Price: सोन्याच्या दरात वाढ, 50 हजाराच्या पातळीकडे वाटचाल, पटापट तपासा आजचे भाव

मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर आज डिसेंबर डिलिव्हरीतील सोन्याचे भाव 0.11 टक्क्यांनी वाढलेले दिसून आले. तर चांदीच्या किंमतीत 0.50 टक्क्यांची घट दिसून आली.

Gold Price: सोन्याच्या दरात वाढ, 50 हजाराच्या पातळीकडे वाटचाल, पटापट तपासा आजचे भाव
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 12:33 PM

नवी दिल्लीः यावर्षी ऐन दसरा आणि दिवाळीच्या काळात सोने आणि चांदीच्या (Gold Price Rate) दरात चढ-उतार दिसून आले. सोन्याच्या दरात दिवाळीदरम्यान काही प्रमाणात घट झाली. मात्र आता या किंमती काही प्रमाणात वाढण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे लग्नसराईदरम्यान सोने खरेदीचा तुमचा विचार असेल तर ही संधी सोडू नका, असा सल्ला जाणकार देत आहेत. तज्ज्ञांच्या मते, दिवाळीच्या काळात (Diwali Festival) सोन्याची भरपूर खरेदी झाली. तसेच लग्नसराईचाही मौसम सुरु आहे. त्यामुळे वाढत्या सोन्या-चांदीच्या मागणीने दरांनाही आधार मिळतो. त्यामुळे सोन्याचे दर पुन्हा हळू हळू 50 हजारांच्या पातळीकडे जात आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर आज डिसेंबर डिलिव्हरीतील सोन्याचे भाव 0.11 टक्क्यांनी वाढलेले दिसून आले. तर चांदीच्या किंमतीत 0.50 टक्क्यांची घट दिसून आली.

वाचा आजचे सोन्या-चांदीचे भाव

ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरी असलेल्या सोन्याचे दर आज 0.11 टक्क्यांनी घसरले. त्यामुळे हे दर 49,350 रुपये प्रति 10 ग्राम या पातळीवर आहेत. तर आजच्या व्यापारात चांदीचे दर 0.50 टक्क्यांनी घटले आहेत. आज 1 किलो चांदीचा भाव 66,895 रुपये एवढा आहे.

देशातील प्रमुख शहरांतील सोन्या-चांदीचे भाव

देशातील प्रमुख शहरांतील सोन्याच्या किंमतीवर नजर टाकल्यास ते पुढीलप्रमाणे दिसून येतात- दिल्ली- 22 कॅरेट सोन्याचे दर 48,240 रुपये प्रति तोळा, 24 कॅरेटचे दर 52,610 रुपये प्रति तोळा मुंबई- 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,920 रुपये प्रति तोळा आणि 24 कॅरेटचे दर 48,920 रुपये प्रति तोळा कोलकाता- 22 कॅरेट सोन्याचा भाव 48,690 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,390 रुपये प्रति तोळा. चेन्नई- 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,500 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,730 रुपये प्रतितोळा एवढे नोंदले गेले.

तर एक किलो शुद्ध चांदीचे भाव दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यात 66,800 रुपये तर चेन्नईत ही किंमत 71,500 रुपये एवढी नोंदवली गेली.

इतर बातम्या-

काय सांगता? पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते, औरंगाबादेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा अजब जावईशोध!

समीर वानखेडे आणि काशिफ खान यांचा काय संबंध आहे? काशिफ आणि व्हाईट दुबईला अटक का केली जात नाही?; मलिक यांचा एनसीबीला सवाल

 

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.