दिवाळीसाठी सजली सराफा बाजारपेठ, लक्ष्मीपूजनासाठी विशेष नाणी, वाचा औरंगाबादचे भाव

औरंगाबादः गेल्या आठवडाभरात घसरणीचे संकेत देणाऱ्या सोन्याच्या भावाने आज स्थिरता प्राप्त केलेली दिसली.  दिवाळीचा सण जवळ येतोय, त्यामुळे बाजारात ग्राहकांच्या खरेदीलाही उधाण आले आहे. आज रविवारी सुटीच्या दिवशी बाजारात जास्त गर्दी दिसून आली.  दिवाळीनंतर काही दिवसांनीच लग्नसराईदेखील असल्याने आपल्या पसंतीचे डिझाइनच्या दागिन्यांची ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे. तसेच औरंगाबादच्या बाजारात लक्ष्मीपूजनासाठीच्या सोन्या-चांदीच्या नाण्यांचीही मोठ्या […]

दिवाळीसाठी सजली सराफा बाजारपेठ, लक्ष्मीपूजनासाठी विशेष नाणी, वाचा औरंगाबादचे भाव
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 6:03 PM

औरंगाबादः गेल्या आठवडाभरात घसरणीचे संकेत देणाऱ्या सोन्याच्या भावाने आज स्थिरता प्राप्त केलेली दिसली.  दिवाळीचा सण जवळ येतोय, त्यामुळे बाजारात ग्राहकांच्या खरेदीलाही उधाण आले आहे. आज रविवारी सुटीच्या दिवशी बाजारात जास्त गर्दी दिसून आली.  दिवाळीनंतर काही दिवसांनीच लग्नसराईदेखील असल्याने आपल्या पसंतीचे डिझाइनच्या दागिन्यांची ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे. तसेच औरंगाबादच्या बाजारात लक्ष्मीपूजनासाठीच्या सोन्या-चांदीच्या नाण्यांचीही मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.

औरंगाबादमध्ये आजचे भाव

आज औरंगाबादमधील सोन्या-चांदीचे भाव हे कालप्रमाणेच म्हणजे 30 ऑक्टोबरच्या दरांवरच स्थिर राहिले. म्हणजेच आज 31 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याचे दर 47,600 रुपये प्रति तोळा एवढे तर 24 कॅरेट सोन्याचे दर 48,500 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 67,800 रुपये एवढे नोंदले गेले. 28 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सोन्याचे भाव 47,800 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,600 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. मंगळवारी औरंगाबादमधील 22 कॅरेट सोन्याचे दर 48,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 49,000 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवण्यात आले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 68,800 रुपये एवढे नोंदले गेले. 25 ऑक्टोबर रोजी सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 49,200 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 48,050 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. एकूणच सोन्याच्या घसरणीकडे सुरु असलेल्या ट्रेंडला आज रविवारी काहीसा ब्रेक लागल्याचे चित्र दिसून आले.

लक्ष्मीपूजनासाठी विशेष नाण्यांची आवक

दिवाळीत लक्ष्मीपूजनाकरिता सोन्या-चांदीची नाणी खरेदी केली जातात. लक्ष्मीची प्रतिमा असलेली ही नाणी कमी वजनापासून उपबब्ध आहेत. अगदी 100 रुपयांच्या नाण्यापासून 8000 रुपयांपर्यंतच्या नाण्यांची बाजारात आवक झाली आहे. लक्ष्मीपूजनाला लहान मोठे व्यावसायिक आपल्या दालनांमध्ये या नाण्यांची पूजा करतात. लक्ष्मीपूजनाच्या आधी दोन दिवस सर्वाधिक हीच नाणी विकली जातात, अशी माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली.

सोन्याची शुद्धता कशी तपासता येईल?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.

इतर बातम्या-

औरंगाबादः 41 वर्षांचा वडिलांचा लढा मुलाने जिंकला, भरपाई 3 वरून 23 लाख रुपयांवर, जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर आली होती जप्ती

औरंगाबादकरांनो खबरदार! पॉझिटिव्ह आलेले गर्दीत फिरून गेले, मास्क टाळू नका! तुम्हीही संपर्कात येऊ शकता

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.