शिक्षण अधिकाऱ्याच्या निरोप समारंभात कोरोना नियमांना हरताळ, मनसेकडून कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न

तापडिया नाट्यमंदिरात एका शिक्षण अधिकाऱ्याच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रामात सरकारी कर्मचाऱ्यांनी कोरोना नियमांना पायदळी तुडवले. या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

शिक्षण अधिकाऱ्याच्या निरोप समारंभात कोरोना नियमांना हरताळ, मनसेकडून कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न
मनसे कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे गोंधळ घातला.
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 4:23 PM

औरंगाबाद : उत्परिवर्तीत डेल्टा प्लस कोरोना विषाणू तसेच तिसरी संभाव्य लाट यामुळे जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू केलेले आहेत. असे असताना औरंगाबाद शहरात सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच या नियमांना पायदळी तुडवले जात आहे. त्याचे एक उदाहरण शहरातील तापडिया नाट्य मंदिरातून समोर आले. तापडिया नाट्यमंदिरात एका शिक्षण अधिकाऱ्याच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रामात सरकारी कर्मचाऱ्यांनी कोरोना नियमांना पायदळी तुडवले. या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. (government employee broke corona rules in educational officer send off program mns opposes)

तापडिया नाट्य मंदिरात शिक्षण अधिकाऱ्याच्या निरोप समारंभाचे आयोजन

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक नियम पुन्हा कडक करण्यात आले आहेत. या नियमांनुसार सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर अनेक निर्बंध आहेत. मात्र, या नियमांचे उल्लंघन औरंगाबाद शहरात झाल्याचे दिसून आले. या ठिकाणी तापडिया नाट्य मंदिरात शिक्षण अधिकाऱ्याच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. सध्या कठोर निर्बंध लागू करण्यात आले असले तरी या कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिक्षण अधिकाऱ्यांसह शिक्षण विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनसेचा कार्यक्रमामध्ये गोंधळ

हा प्रकार समोर आल्यानंतर औरंगाबाद मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी सामान्यांना वेगळा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना वेगळा नियम असे चालणार नाही, असे म्हणत कार्यक्रमात गोंधळ घातला. तसेच निरोप समारंभाचा हा कार्यक्रम मनसे कार्यकर्त्यांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

पहा व्हिडीओ :

राज्य सरकारकडून नियम पाळण्याचे आवाहन

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही धोका टळलेला नाही. त्यातच सध्या तिसरी लाट लवकरच येणार असल्याचे सांगितले जात आहे. डेल्टा प्लस उत्परिवर्तीत कोरोना विषाणूचे संकटही समोर उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून केले जात आहे.

इतर बातम्या :

लसीसाठी सोशल डिस्टन्स ठेवून चप्पल रांगेत, औरंगाबादकरांची शक्कल, स्वत: सावलीत घोळका

आमदार अंबादास दानवेंची बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण, क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार

टीव्ही 9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, औरंगाबादेत लसीकरणासाठी नागरिकांना टोकनचे वाटप

(government employee broke corona rules in educational officer send off program mns opposes)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.