गुलाबराव पाटलांची सिल्लोडमध्ये तुफान फटकेबाजी, अडीच वर्षांपूर्वी लव्ह मॅरीज तुटलं, ब्रेक के बाद…
मागच्या काळात अडीच वर्षांपूर्व रावसाहेब दानवे आणि आमचं लव्ह मॅरीज तुटलं.
दत्ता कनवटे, TV9 मराठी, प्रतिनिधी, औरंगाबाद : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, मी शिवसेनाप्रमुखांचा शिपाई. सिल्लोड पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनानिमित्त उपस्थित आहे. यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. कमी वेळेत जास्त रन काढायचे आहेत. असं म्हणून त्यांनी खून की माँग करते हो इस देश के लिए. मेरे नजदिक हैं कुर्बानी छोटी दे दो. जिनसे मांगते हो वोट उनको पाणी दे दो. उन्हे पाणी और रोटी तो द दो. अशा शायरीनं आपल्या भाषणाची सुरुवात केली. (टाळ्या…)
गुलाबराव पाटलांनी सांगितलं की, मागच्या काळात अडीच वर्षांपूर्व रावसाहेब दानवे आणि आमचं लव्ह मॅरीज तुटलं. त्यावेळी माझ्याकडं पाणीपुरवठा खातं होतं. पण, केंद्रात आणि राज्यात वेगवेगळी सत्ता होती. जलजीवन मिशन ही योजना सुरू करण्यात आली. 700 ते 800 कोटी रुपयांचा बजेट असायचा.
आता 34 हजार गावांना पाणी पाजायला दिली आहे. 30 हजार गावांचे डीपीआर तयार झाली आहेत. 22 हजार गावांच्या वर्क ऑर्डर देण्याच्या तयारीत आहोत. प्रत्यक्षात 10 हजार गावांच्या कामांची सुरुवात झाली आहे. एकट्या संभाजीनगर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 2,70,069 कोटी रुपये आपण पाणीपुरवठ्याकरिता मंजूर केले आहेत. अशी फटकेबाजी त्यांनी केली.
योगायोग असा की, लोकं रस्त्यासाठी, शाळेकरिता मागणी करतात. त्याच्या पाचपट मागणी पाण्याची आहे. ब्रेक के बाद यांचं आणि आमचं आय लव्ह यू झालं. मी एकमेव मंत्री आहे मला पुन्हा तेचं खातं मिळालं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना वाटलं असेल की, ही कामं 2024 पर्यंत संपवायची आहेत. नवीन मंत्री आल्यानंतर त्यांना विषय समजायला लागतील. म्हणून कदाचित तेचं खातं मला पुन्हा देण्यात आलं असावं, असं गुलाबराव पाटील म्हणाले.