औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबादमध्ये औरंजेबाच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यावरून वादंग निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्षांनी हा मुद्दा लावून घेत आंबेडकरांवर टीका केली आहे. तर आंबेडकरांच्या या कृतीवरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरे गटाला घेरलं आहे. ठाकरे गटाने आता यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच ठाकरे गट औरंगजेबासमोर झुकणाऱ्या नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसणार आहे काय? असा सवालही विरोधकांनी केला आहे. आता या वादात वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही उडी घेतली आहे. औरंजेब हा पर्याय होऊ शकत नाही. जयचंदपेक्षा महोरक्या महत्त्वाचा असतो, असा पलटावर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी मीडियाशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. आशा विचारांच्या कुणी किती निकट जावे हे ठरवले पाहिजे. औरंगजेबाचे उदात्तीकरण होत आहे, हे संविधान मानणारा माणूस मान्य करू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांचे वारसदार औरंगजेबाला थारा देऊ शकत नाही, असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.
प्रकाश आंबेडकर धर्मावर राजकारण करत नाहीत, पण प्रत्येकाने स्वतःत बदल केला पाहिजे. अल्पसंख्याक समाजातील मते बाळासाहेबांना कधीही मिळत नव्हती. पण बाळासाहेबांच्या डोक्यात काय चाललंय कळत नाही. त्यांचा एमआयएमचा फॉर्म्युला फेल गेला होता. त्यामुळे आता काहीही होणार नाही. प्रकाश आंबेडकर यांना अल्पसंख्याक समाजाचा काहीही फायदा होणार नाही, असा दावा सदावर्ते यांनी केला.
जयचंद पेक्षाम्होरक्या महत्त्वाचा असतो. प्रकाश आंबेडकर वकील आहेत ते आपली थिअरी लादतात. औरंगजेब हा पर्याय होऊच शकत नाही. औरंगजेब..? छे छे छे छे छे छे छे छे छे छे छे छे… शी शी शी… छे छे, असंही ते म्हणाले.
राजकारणासाठी उद्धव ठाकरे फिट नाहीत. प्रकाश आंबेडकर हे राजकारणासाठी कधीही कुणाची वकिली करत नव्हते, इस बदलाव को क्या कहेंगे? हा हा हा हा हा हा हा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.