Aurangabad | तांदळाच्या दुकानातून 1 कोटी जप्त, औरंगाबादेत शहागंजमध्ये मोठे हवाला रॅकेट उघड

पोलीसांनी घेतलेल्या झाडाझडतीत घटनास्थळी पेन, पेन्सिल, मशीनसह दोन डायऱ्या सापडल्या. 30 नोव्हेंबर 2021 पासून त्यात नोंदी आहेत. त्यात फार सविस्तर न कळतील अशा नावांसमोर लाखोंच्या नोंदी आढळल्या.

Aurangabad | तांदळाच्या दुकानातून 1 कोटी जप्त, औरंगाबादेत शहागंजमध्ये मोठे हवाला रॅकेट उघड
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 10:04 AM

औरंगाबादः तांदळाच्या दुकानातून हवाला रॅकेट (Hawala Racket) चालवणाऱ्या एकाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. शहरातील शहगंजहून (Shahganj) चेलीपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सुरेश राईस किराणा दुकानात छापा मारून पोलिसांनी ही कारवाई केली. मंगळवारी संध्याकाळी गुन्हेशाखेने (Crime Branch) ही कारवाई करत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. या ठिकाणाहून तब्बल 01 कोटी साडेनऊ लाख रुपये जप्त करण्यात आले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास येथील किराणा व्यापारी आशिष सावजी यांना मशीनने नोटा मोजत असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सावजी हवाला रॅकेट चालवत असावा, तशा नोंदीही त्याच्याकडे सापडल्या असून पोलीस आता या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्यासाठी तपास करत आहेत.

किराणा सामानाचे मागे नोटांची बंडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहागंज ते चेलीपुरा या रस्त्यावर सुरेश राईस या दुकानात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार चालत असल्याची माहिती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके आणि त्यांच्या पथकाने सुरेश राईस या दुकानाच्या बाहेर दिवसभर रेकी केली. यात अनेकजण काहीही सामान न घेता दुकानातून परतत असल्याचे दिसून आले. त्यानंतर काहीतरी काळंबेरं असल्याची खात्री पटल्यावर पोलीस पथकाने सायंकाळी थेट दुकानावर छापा मारला. अधिक झाडाझडती घेतली असता दुकानाच्या समोरील भागात किराणा सामान आणि मागे नोटांची बंडलं रचून ठेवलेली आढळली.

घटनास्थळी दोन डायऱ्या, अनेक नोंदणी

पोलीसांनी घेतलेल्या झाडाझडतीत घटनास्थळी पेन, पेन्सिल, मशीनसह दोन डायऱ्या सापडल्या. 30 नोव्हेंबर 2021 पासून त्यात नोंदी आहेत. त्यात फार सविस्तर न कळतील अशा नावांसमोर लाखोंच्या नोंदी आढळल्या. आता यात सह्या करणारे नेमके कोण आहेत, याचा तपास पोलीस करतील.

पुढील तपास जीएसटी, आयकर विभाग करणार

सुरेश राईस दुकानात सापडलेल्या पैशाचा हिशेब आयकर विभाग, जीएसटी विभाग करणार आहे. हे पैसे कुठून आले, येथून कुठे जात होते, याविषयी पुढील दोन दिवसात तपास केली जाईल, असे अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.