लॉकडाऊन लागणार काय?; राज्याला किती लसींची गरज, मास्क कोणता वापरावा?; वाचा तुमच्या मनातील प्रश्नांना राजेश टोपेंचे उत्तर
आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात जाऊन टोपे यांनी या लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.
जालना: आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात जाऊन टोपे यांनी या लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी राज्यात लॉकडाऊन लागणार काय? राज्याला किती आणि कोणत्या लसींची अवश्यकता आहे आणि नेमका कोणता मास्क लावावा, या जनतेच्या मनातील प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
लॉकडाऊन लागणार काय?
राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना राज्यात लॉकडाऊन लागणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर टोपे म्हणाले की, काल केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी त्यांच्यापुढे लॉकडाऊनचा मुद्दा मांडण्यात आला. प्रत्येक राज्यात लॉकडाऊनची परिभाषा वेगवेगळी करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रात बेड ऑक्युपन्सी म्हणजे उपलब्ध बेड किती? ऑक्यूपाय किती झाले? समजा 40 टक्क्यांपर्यंत ऑक्यूपाय झाले आणि ऑक्सिजन कन्झम्प्शन दररोजचं 700 मॅट्रीक टन वाढलं तर महाराष्ट्रात लॉकडाऊन करावं असा निकष लावून आम्ही परिभाषा केली आहे. आता प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने लॉकडाऊनची परिभाषा सुरू आहे. हरियाणात लॉकडाऊन लागल्याचं कळलं. दिल्लीतही चर्चा आहे. आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना सांगितलं, एकच परिभाषा असावी. आयसीएमआरने सर्वच राज्यांना निर्बंध आणि लॉकडाऊनबाबत समान नियम लागू केला पाहिजे.
मास्क कोणता लावावा?
नागरिकांना कोणता मास्क लावला पाहिजे, असा प्रश्न त्यांना करण्यात आला. त्यावर मास्क वॉशेबल घालावा. मीही वॉशेबल मास्क वापरतो. नाही तर एन-95चा मास्क वापरावा. एन-95चा मास्क ठरावीक कालावधीचा असेल तर तो वापरल्यावर डिस्पोझल करावा, असं त्यांनी सांगितलं.
राज्याला किती लसींचा साठा हवा आहे?
राज्याला अजूनही कोरोना लसींचा साठा हवा आहे की राज्याकडे पुरेसा लसींचा साठा आहे? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर, संपूर्ण राज्यात आणि देशात लसीकरण सुरू झालं आहे. माझ्या समोर आठ दहा जणांचं लसीकरण केलं आहे. मुलं लसीकरणासाठी उत्साहाने येत आहेत. त्यांची नोंदणी आधी केली आहे. जी काही केंद्राची गाईडलाईन आहे. त्यानुसार स्वतंत्र नोंदणी आणि व्यवस्था केली आहे. पोस्ट लसीकरण नंतरचे ऑब्सर्व्हेशन याची व्यवस्थाही केली आहे. 15 ते 18 वयोगट हा खूप फिरणारा ग्रुप असतो. या ग्रुपमध्ये लसीकरणाची गरज होती. केंद्रीय मांडवीयांसोबत काल बैठक झाली. त्यात सर्व मुद्दे मांडले. 12 वर्षाच्या मुलांनाही लस देण्याची मागणी केली आहे. तसेच एमर्जन्सी सर्व्हिसमधील कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी कोविशिल्ड 40 लाख आणि कोव्हॅक्सिनचे 50 लाख डोसची गरज आहे. या लसींचा राज्यांना पुरवठा केला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.
Live Maharashtra News Live Update : नाशिकमध्ये वस्तीगृहातील 17 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्हhttps://t.co/kUChYxayy1#Corona | #Omicrion | #vaccination
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 3, 2022
संबंधित बातम्या:
आई किचनमध्ये, पाच भावंडं टीव्ही बघण्यात गुंग, पाण्याच्या बालदीत पडून भिवंडीत चिमुकल्याचा मृत्यू