मराठवाड्यात पावसाचा महाप्रताप, लातूर-नांदेड-परभणी-बीडमधले धरणं फुल्ल, काही ठिकाणी कित्येक वर्षात पहिल्यांदाच पूर
ग्रामीण भागातील अनेक नदी-नाले ओसंडून वाहत असून असंख्य गावांत घरात पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वीज गायब झाल्याने, पुराचे पाणी आणि अंधार यामुळे विविध गावांमधील नागरिकांनी मंगळवारची अख्खी रात्र जागून काढली..
औरंगाबाद: यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच मराठवाड्यात पावसाचा महाप्रताप पहायला मिळत आहे. औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस (Heavy rain in Marathwada reagion) झाला. औरंगाबाद आणि मराठवाड्यातील काही भागात मंगळवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अतिवृष्टीला सुरुवात झाली. तर काही भागांमध्ये काल दिवसभर पावसाचा सपाख्य रस्त्याशी जोडणारे लहान पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वीज टा सुरुच होता. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नदी-नाले ओसंडून वाहत असून असंख्य गावांत घरात पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वीज गायब झाल्याने, पुराचे पाणी आणि अंधार यामुळे विविध गावांमधील नागरिकांनी मंगळवारची अख्खी रात्र जागून काढली..
औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूल तलाव ओव्हरफ्लो
रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक हर्सूल तलाव ओसंडून वाहू लागला. तलाव पूर्णपणे भरल्यामुळे तलावाच्या सांडव्यातून पाणी वहायला सुरुवात झाली आहे. दरम्यान हर्सूल तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे खाम नदीला पूर आला आहे. पाऊस पडल्यावर हर्सूल तलावाचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी नागरिकांची गर्दी होते. त्याचप्रमाणे मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर हा तलाव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
पिशोर परिसरात १० गावांचा संपर्क तुटला
कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अंजना-पळशी मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे. परिणामी अंजना नदीला पूर आला. ही नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दहा गावांचा संपर्क तुटला. सोमवारी रात्रीपासून पिशोरला मुसळधार पाऊस होत असल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. मंगळवारी आठवडी बाजार असल्याने गावांतील नागरिकांचे खूप हाल झाल्याचे वृत्त दै. लोकमध्ये प्रकाशित झाले आहे. या परिसरातील भारंबा, भारंबा तांडा, माळेगाव ठोकळ, माळेगाव लोखंडी, कोळंबी, जैतखेडा, साळेगाव, साळेगाव तांडा, पळशी बु., पळशी खुर्द आदी गावांचा पिशोरशी संपर्क तुटला आहे.
नांदेड – माजी आमदार राठोड यांचे पुत्र व नातू वाहून गेले
काल मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेडमध्येही पूरस्थिती निर्माण झाली. विष्णूपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले. कौठा रस्त्याने मुखेडकडे येत असताना माजी आमदार किशनराव राठोड यांचे पुत्र भगवान राठोड व नातू संदीप राठोड कारसह वाहून गेले. नाल्यावरून कार खाली पडली आणि बुडाली. यातील सेवक उद्धव देवकते हा झाडावर चढून बसल्याने वाचला.
सिल्लोडचा अंजना नदीवरील पूल खचला
सिल्लोड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजना नदीवरील पूल खचला. अंजना नदीलाही तुफान पूर आला. नदी दुथडी भरून वाहू लागल्याने सिल्लोड तालुक्यातील पळशी, उपळी, दीडगाव, भराडी या गावांचा संपर्क तुटला. कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात रात्री साडे आठ वाजता 94 टक्के साठा झाल्याने रात्री नऊ वाजेच्या सुमारास धरणाचे तीन दरवाजे उघडले. त्यातून 9720 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असल्याचे सूत्रांकडून कळते. मंगळवारी दिवसभरातील पावसामुळे धरणाची पाणी पातळी टप्प्या-टप्प्याने वाढत गेली. त्यानुसार दुपारपासूनच प्रशासनाकडून शिवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
ढगफुटीमुळे पाचोडची घरे पाण्यात, अख्खी रात्र जागून काढली
पाचोड परिसरात मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेपासूनच वीजेच्या गडगडाटासह अतिवृष्टीला सुरुवात झाली. पाचोडमध्ये पोलिस कॉलनीसह औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झाले. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. अनेक घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंची मोठी हानी झाली. कापूस, तूर, मूग, मका, बाजरी ही पिके अतिवृष्टीमुळे खराब झाली. उभ्या शिवारात पाण्याचा प्रवाह शिरल्याने पिके झोपल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.
लातूरच्या मांजरा प्रकल्पात 63 टक्के पाणी
लातूर जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असून सर्वच महसूल मंडळात दमदार पाऊस झाला. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातही झपाट्याने वाढ होत आहे. हे धरण साधारण 63.2 टक्के भरले आहे. त्यामुळे लातूरसह परिसरातील गावांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. (Heavy rainfall and thunderstorm in Aurangabad, Latur, Beed, Nanded and all Marathwada region, Maharashtra)
इतर बातम्या-