चिकलठाणा एमआयडीसी कंपन्यांमध्येही पाणी शिरले, कर भरूनही नालेसफाई न केल्याने उद्योजकांचा पालिकेवर संताप

एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे अध्यक्ष नारायण पवार यांनी दिली.

चिकलठाणा एमआयडीसी कंपन्यांमध्येही पाणी शिरले, कर भरूनही नालेसफाई न केल्याने उद्योजकांचा पालिकेवर संताप
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 12:09 PM

औरंगाबाद: मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील (Heavy Rain in Aurangabad) जवळपास सर्वच भागांना नुकसान पोहोचले आहे. चिकलठाणा आणि रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील सर्वच कंपन्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. मनपाने (Aurangabad Municipal cororation) कर भरूनही ना चांगले रस्ते दिले ना सफाई केली, अशी तक्रार उद्योजक करत आहेत. आता इंडस्ट्रीतील अनेक युनिटमध्ये पाणी गेल्याने उद्योजकांना स्वतः यंत्रणा लावून हे पाणी काढावे लागत आहे. एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये (MIDC Aurangabad) पाणी शिरल्याने सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे अध्यक्ष नारायण पवार (Narayan Pawar) यांनी दिली.

पालिकेची नालेसफाई नावालाच

27 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून झालेल्या पावसामुळे शहरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. उद्योग जगतालाही मोठा फटका बसला आहे. चिकलठाणा एमआयडीसीत 500 तर वाळूजमध्ये 800 हून अधिक युनिट आहेत. नारेगाव भागात रस्त्याचे काम झाले तेव्हा पुलाखाली असलेल्या पाठपमद्ये माती भरल्याने पाणी जाण्यास जागा राहिली नाही. त्यामुळे अनेक कंपन्यांत पाणी शिरले. मनपाने मध्यंतरी केलेली नालेसफाई नावालाच झाल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे.

4 तास पाणी उपसून काढले

चिकलठाणा एमआयडीसीतील सर्व कंपन्या महानगरपालिकेचा कर भरतात. पण येथील परिसराला महानगरपालिकेतर्फे मूलभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. विशेष म्हणजे हा प्रकार या वर्षीचाच नानही. गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आम्हाला कर्मचारी लावून 4 तास पाणी उपसून काढावे लागत असल्याची तक्रार विजय लेकुरवाळे यांनी केली.

तुळजा ऑइल कंपनीचे अडीच लाखांचे नुकसान

चिकलठाण्यात तुळजा ऑइल कंपनी आहे. हिंदुस्थान गॅस कंपनीच्या भिंतीच्या बाजूला नाला आहे. तो बंद झाल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. कंपनीतच गुडघाभर पाणी शिरल्याने येथील मशीनरी आणि साधन सामग्रीचे सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 1984 पासून हाच प्रकार सुरु आहे. मुसळधार पाऊस येताच, कंपनीत पाणी शिरते, अशी तक्रार अनिल कसबेकर यांनी केली.

इतर बातम्या- 

Aurangabad: पाहता पाहता दोघे वाहून गेले, नागझरी नदीच्या महापुरातून जात होते शेतकरी, गावात पोहोचलेच नाहीत

Aurangabad Crime:  9 महिन्यात 62 गुन्ह्यांची उकल करण्यात श्वानांची मदत, औरंगाबाद पोलीस दलातील प्रशिक्षित श्वानांची कामगिरी  

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.