चिखलाच्या साम्राज्यातून रस्ता काढण्याची कसरत, औरंगाबादेत विरगाव परिसराची दैना, सिल्लोड-गंगापुरातही नागरिक त्रस्त

विरगाव परिसरातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. चिखलात फसलेली वाहने काढण्यासाठी गावकऱ्यांना ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागत आहे. चार-चार ट्रॅक्टर लावून गावकरी पुढील रस्ता काढत आहेत.

चिखलाच्या साम्राज्यातून रस्ता काढण्याची कसरत, औरंगाबादेत विरगाव परिसराची दैना, सिल्लोड-गंगापुरातही नागरिक त्रस्त
औरंगाबादमधील वीरगाव परिसरातील नागरिकांना शेतात ये-जा करण्यासाठी अशी कसरत करावी लागत आहे.
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 10:47 AM

औरंगाबाद: परतीच्या पावसाचा मारा अजूनही औरंगाबाद शहर (Heavy rain in Aurangabad) आणि परिसरावर सुरु आहे. शुक्रवारी दिवसभर वीजांचा कडकडाट अ्न मुसळधार पावसाचे फटकारे सुरुच होते. औरंगाबादच्या ग्रामीण भागात रस्ते (Damaged roads) नसल्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतोय. गावातील कच्च्या रस्त्यांवर गुडघाभर चिखल असल्याने वाहनेही फसून बसत आहेत. यामुळे आवश्यक कामासाठी बाहेर जाणाऱ्या गावकऱ्यांवा मोठी कसरत करावी लागत आहे. औरंगाबादेतल्या विरगावातील (Virgaon in Aurangabad) असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

चिखलात फसलेली वाहने काढण्यासाठी ट्रॅक्टर

विरगाव परिसरातील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. चिखलात फसलेली वाहने काढण्यासाठी गावकऱ्यांना ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागत आहे. चार-चार ट्रॅक्टर लावून गावकरी पुढील रस्ता काढत आहेत. शेतात ये-जा करण्यासाठी दररोज हा रस्ता पार करण्याचे आव्हान या शेतकऱ्यांसमोर असते. यावरून मराठवाड्यातील इतरही ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल, याचे चित्र स्पष्ट होते. विरगावातला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिल्लोडः डकला परिसरात वीज पडून शेतकरी ठार

औरंगाबादच्या ग्रामीण भागात वीजांच्या कडकडाटामुळेही खूप नुकसान होत आहे. सिल्लोड तालुक्यातील हळदा-डकला परिसरात वीज पडून एक जण ठार, तर कुटुंबातील एक सदस्य गंभीररीत्या भाजला आहे. मधुकर ननावरे असे वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. उंडणगाव परिसरातील डकला येथील शेतकरी मधुकर लोटू ननावरे (३५) हे शेतात मुलगा विशाल ननावरे (१६) याच्यासह शेतकाम करत असताना परिसरात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. ननावरे यांनी झाडाचा आसरा घेतला असता अचानक वीज पडून मधुकर ननावरे यांचा जागीच मृत्यू झाले. तर विशाल ननावरे हा गंभीररीत्या भाजला आहे. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तर येथे शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी पावसात वीज पडून शेतकरी गजानन विठ्ठल लहाने यांचे बैल दगावल्याची घटना घडली. तलाठी विष्णू सोनवणे यांनी भेट देऊन पंचनामा केला.

गंगापूरः नदीकाढच्या गावांना संरक्षक भिंत बांधण्याची मागणी

गंगापूर व खुलताबाद तालुक्यांतील शिवना, गिरिजा, धाडसह इतर नद्यांना मागील महिनाभरात दोन वेळा आलेल्या महापुरामुळे नदीकाठारील नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून भविष्यात नुकसान टाळण्यासाठी वरील नद्यांवर संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष संतोष माने यांनी भेट घेऊन झालेल्या नुकसानीची माहिती देऊन त्यांना लिखित स्वरूपात निवेदन दिले. गंगापूर तालुक्यातील शिवनासह इतर नद्यांच्या काठावर असलेल्या व खुलताबाद तालुक्यातील गिरिजासह इतर नद्यांच्या काठावरील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे लाखो हेक्टर जमीन खरडून गेली व शेकडो नागरिक बेघर होऊन काही जणांना प्राण गमवावे लागले. भविष्यात अशा प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी वरील दोन्ही तालुक्यांतील नदीकाठावर संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी संतोष माने यांनी मंत्री पाटील यांच्याकडे केली आहे.

इतर बातम्या- 

Aurangabad | पुराच्या पाण्यात वाहून जाणारी गाडी वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रयत्न

Corona: शहराच्या प्रवेशद्वारांवर पुन्हा चेकिंग! नगरमधील फैलावामुळे औरंगाबाद गॅसवर!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.