High Speed Train: समृद्धी महामार्गाला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचे नियंत्रण केंद्र औरंगाबादेत!
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला समांतर अशा हायस्पीड ट्रेनच्या प्रकल्पालाही आता वेग मिळताना दिसतोय. या प्रकल्पाचे रेल्वेचे प्रादेशिक केंद्र
औरंगाबादः मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला (Samruddhi High way) समांतर अशा मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेच्या (High Speed Train) प्रस्तावित प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठीच्या भूसंपादनासह इतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रेल्वेचे प्रादेशिक नियंत्रण केंद्र औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात तयार होत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास औरंगाबादहून मुंबईला पोहोचण्यासाठी फक्त पावणेदोन तासाचा वेळ लागणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात 111 किलोमीटरचा ट्रॅक
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच नागपूर ते शिर्डी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या महामार्गाला समांतर मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वेचा प्रकल्पही प्रस्तावित आहे. चार महिन्यांपूर्वी औरंगाबादमध्ये या प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया कशी असणार यासह इतर बाबींवर रेल्वे अधिकारी, जिल्हा प्रशासन, शेतकरी, नागरिकांमध्ये सखोल चर्चा झाली. आता जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वेचे प्रादेशिक नियंत्रण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या रेल्वेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात 111 किलोमीटर ट्रॅक निर्माण करण्यात येणार आहेत. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचा हा प्रकल्प प्रस्तावित असून लवकरच डीपीआरचे काम हाती घेतले जाईल. त्यानंतर प्रकल्पाचा एकूण खर्च, बांधणीचा कालावधी, एकूण रहदारी या बाबी स्पष्ट होतील.
हायस्पीड रेल्वे- औरंगाबादेत कुठे कुठे भूसंपादन?
औरंगाबाद जिल्ह्यात तीन गावांजवळून हायस्पीड रेल्वे जाणार आहे. यासाठी 167.96 हेक्टर जमीन लागणार असून 73.73 हेक्टर जमीन खासगी व 94.22 हेक्टर जमीन खासगी व 94.22 हेक्टर जमीन सरकारी अशी वापरली जाईल. सरकारी 201 तर खासगी 410 भूखंड यासाठी संपादित करावे लागतील. औरंगाबाद तालुक्यात 23 गावांतील 61.94 हेक्टर जागेचा यात समावेश आहे. गंगापूरमध्ये 11 गावांतील 37.10 तर वैजापुरात 15 गावांतील 67.90 हेक्टर जागेचा यात समावेश आहे.
इतर बातम्या-