औरंगाबादेत लेबर कॉलनीत मंगळवारी पाडापाडी होण्याची शक्यता, रहिवाशांचे उपोषण सुरूच
औरंगाबादः शहरातील बहुचर्चित विश्वास नगर लेबर कॉलनीतील (Labor colony) जीर्ण शासकीय वसाहतींवर आता येत्या सोमवार किंवा मंगळवारी पाडापाडीची कारवाई होण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. 08 नोव्हेंबर पर्यंत ही घरे रिकामी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) दिले होते. अवैध मालकी हक्क आणि जीर्ण वसाहती या दोन कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. मात्र येथील […]
औरंगाबादः शहरातील बहुचर्चित विश्वास नगर लेबर कॉलनीतील (Labor colony) जीर्ण शासकीय वसाहतींवर आता येत्या सोमवार किंवा मंगळवारी पाडापाडीची कारवाई होण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. 08 नोव्हेंबर पर्यंत ही घरे रिकामी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) दिले होते. अवैध मालकी हक्क आणि जीर्ण वसाहती या दोन कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात येत आहे. मात्र येथील जागा आणि मालकी हक्काच्या वादावरून नागरिकांनी कोर्टात धाव घेतली असून प्रशासनाने रहिवाशांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, या मागणीसाठी नागरिकांनी बुधवारपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. ते अजूनही सुरूच आहे.
जमा कागदपत्रांची छाननी होणार
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी लेबर कॉलनीतील रहिवाशांना घरासंबंधीची कागदपत्रे प्रशासनाकडे जमा करण्याचे आवाहन केले होते. सेवानिवृत्त, त्यांच्या वारसांचा समावेश असलेल्या 183 क्वार्टर्सधारकांनी प्रशासनाकडे बुधवारी सायंकाळपर्यंत कागदपत्रे जमा केली. त्यांची छाननी आता प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. छाननीनंतर पुनर्वसनाचा निर्णय शासन स्तरावर होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गुरुवारी क्वार्टर्सधारकांनी जमा केलेल्या कागदपत्रांवर चर्चा झाली. तसेच शासनाने ही वसाहत पाडण्यासाठी परवानगी दिल्यामुळे आता पुढील कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
घरे पाडल्यानंतर कुणाचाही दावा स्वीकारला जाणार नाही
लेबर कॉलनीतील 338 क्वार्टर्सधारकांपैकी फक्त 183 रहिवाशांनी आपली कागदपत्रे शासनाकडे सुपूर्द केली आहेत. त्यांचे अर्ज भरून सर्व्हे केला जाणार आहे. पाडापाडीच्या कारवाईनंतर कुणाच्याही मालकीचा दावा स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कोण आहेत, त्यांचे नातेवाईक, वारस कोण आहेत, याचे रेकॉर्ड प्रशासनाकडे असले पाहिजे. यासाठी माहिती गोळा केली जात आहे. पुढील दोन दिवस जिल्हाधिकारी औरंगाबादमध्ये नाहीत. त्यामुळे सोमवारी किंवा मंगळवारी कॉलनीतील घरे पाडण्याची कारवाई सुरु होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
इतर बातम्या-