Raj Thackeray: अमरावतीसारख्या दंगली घडल्या तर सोडायचं नाही!! औरंगाबादेत राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच पक्ष बांधणीच्या उद्देशाने यावेळी मराठवाडास्तरीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर खास शैलीत भाषण केले.

Raj Thackeray: अमरावतीसारख्या दंगली घडल्या तर सोडायचं नाही!! औरंगाबादेत राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश
मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला राज ठाकरे यांचे मार्गदर्शन
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 10:39 AM

औरंगाबादः त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात. अमरावतीत दंगल उसळते.  जनतेच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्यासाठीच अशा दंगली घडवल्या जातात.  मात्र अमरावतीत जे घडले, तशी घटना महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात घडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सोडायचं नाही. अशा लोकांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंगळवारी औरंगाबादेत दिला. शहरात आयोजित मराठवाडास्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उद्देशून ते बोलत होते.

प्रत्येक घरावर मनसेचा झेंडा लावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या औरंगाबाद दौऱ्यात हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. शहरात राज ठाकरे येण्यापूर्वी जय श्रीराम चा नारा देणारे बॅनर लावण्यात आले होते. तसेच कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उद्देशून बोलताना राज ठाकरे यांनी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर मनसेचा झेंडा असला पाहिजे, असे आदेश दिले. तसेच शहरातील प्रत्येक चौकात पक्षाचा झेंडा लावा असेही ते म्हटले. निवडणुकीपूर्वी लोकांचा विश्वास संपादन करा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

राज ठाकरेंची पाठ फिरण्यापूर्वीच बॅनर काढले

दरम्यान महापालिकेने मंगळवारी कारवाई करत सर्वच पक्षांचे शहरात लावलेले बॅनर काढले. राज ठाकरे शहरात येण्यापूर्वी मनसैनिकांनी पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे लावे होते. ठाकरे यांनी शहर सोडण्यापूर्वीच महापालिकेने कारवाईचा बडगला उगारत शहरातील सर्व अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स जप्त केले. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले होर्डिंग, आमदार अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले 25 ते 30 फूट उंच होर्डिंग काँग्रेसने लावलेले होर्डिंगही जप्त केले.

इतर बातम्या

Thane School Reopen : ठाण्यातील शाळा आजपासून सुरु, ग्रामीण सह शहरी भागातील शाळा विद्यार्थ्यांनी गजबजणार

Shiv Sena| शिवसेना अजून यूपीएचा भाग नाही, मिनी UPA चा प्रयोग सुरू; संजय राऊत यांचे वक्तव्य

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.