“इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि नाव कसं बदलता ?” औरंगाबादच्या नामांतरावरुन इम्तियाज जलील आक्रमक, वाद पुन्हा पेटणार ?

या शहराचा खूप विकास करा. त्याला फाईव्ह स्टार कॅटेगिरित आणा. पण इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि नाव कसं बदलता ?" असा बोचरा सवाल औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि नाव कसं बदलता ? औरंगाबादच्या नामांतरावरुन इम्तियाज जलील आक्रमक, वाद पुन्हा पेटणार ?
MP-Imtiaz-Jaleel
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 8:58 PM

औरंगाबाद : “या शहराचा खूप विकास करा. त्याला फाईव्ह स्टार कॅटेगिरित आणा. पण इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि नाव कसं बदलता ?” असा बोचरा सवाल औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केला. शिवसेना तसेच भाजपकडून औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव बदलून ते संभाजीनगर (Sambhaji Nagar) करावे अशी मागणी सातत्याने केली जाते. यावर बोलताना जलील यांनी वरील भाष्य केले. (Imtiaz Jaleel opposes renaming of Aurangabad as Sambhaji Nagar criticizes opposition)

शिवसेना, भाजपचे नेते औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करतात

मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नाव बदलून ते संभाजीनगर केले जावे अशी मागणी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष आघाडीवर आहेत. सत्तेत नसताना विशेष रुपाने शिवसेनेकडून ही मागणी केली गेली होती. भाजप तसेच शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी आजही औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करतात. यावरुन राज्यात मोठा वाद-प्रतिवाद यापूर्वी रंगलेला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादचे नाव बदलण्याच्या विषयावर सविस्तर भाष्य केलं आहे. त्यांनी “या शहराला खूप विकसित करा. फाईव्ह स्टार कॅटगरीत आणा आणि मगच नाव बद्दलण्याचा विचार करा. इथे लोकांना प्यायला पाणी नाही. नाव कसं बदलता ?” असं रोखठोक मत व्यक्त केलंय.

काँग्रेसचा नामांतरला विरोध

याच वर्षी जानेवारी महिन्यात औरंगाबादच्या नामांतरावरुन चांगलाच वाद पेटला होता. काँग्रेसने शहराचे नाव बदलण्यास विरोध केला होता. काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध असल्याचे सांगितलं होतं. त्यांच्या या भूमिकेनंतर शिवसेना आणि काँग्रेस आमनेसामने आले होते.

औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा

तर याच वादावर भाष्य करताना औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं ही पूर्वीपासूनच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती, असं मत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं होतं. तसेच ही आजची घोषणा नाही. संभाजीनगर नाव देणं हे काही चुकीचं नाही. शिवसेनेचा जन्मच हिंदूत्वापासून झालेला आहे. शिवसेना जेव्हा राज्यात आली तेव्हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आली, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी 8 जानेवारी रोजी दिली होती.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, आता औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या वादात एमआयएमने उडी घेतली आहे. जलील यांच्या या वक्तव्यामुळे आता शिवसैनिक आणि भाजप नेते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

क्रीडा विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन खासदार इम्तियाज जलील आक्रमक, स्वातंत्र्य दिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले जाणार

युवासेनेच्या संवाद मेळाव्यात गर्दी जमवणे भोवले, औरंगाबादेत आयोजकांवर गुन्हा दाखल

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपची अध्यात्मिक आघाडी पुन्हा आक्रमक, घृष्णेश्वर मंदिरासमोर आंदोलनाचा इशारा

(Imtiaz Jaleel opposes renaming of Aurangabad as Sambhaji Nagar criticizes opposition)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.