Auranagabad: ख्रिश्चन धर्माचा त्याग करून 53 जणांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश, पैठणमध्ये नाथवंशजांच्या हस्ते स्वीकृती

पैठण येथील एका कार्यक्रमात ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश केलेल्या 53 जणांचे स्वागत करण्यात आले.

Auranagabad: ख्रिश्चन धर्माचा त्याग करून 53 जणांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश, पैठणमध्ये नाथवंशजांच्या हस्ते स्वीकृती
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 3:35 PM

औरंगाबादः जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील दहा कुटुंबातील 53 व्यक्तींनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. पैठण येथील नाथ महाराजांच्या वंशजांतर्फे रविवारी या लोकांचा सत्कार करण्यात आला. तसेच हिंदू धर्मात त्यांना जाहीर रित्या स्वीकृती देण्यात आली, अशी माहिती पैठण येथील ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी दिली.

धर्मांतर नव्हे धर्मवापसी!

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील दहा कुटुंबातील महिला, पुरुष व बालक अशा 53 जणांनी काही दिवसांपूर्वी हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मात्र काही दिवसातच त्यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारला. शनिवारी दक्षिण काशीचे धर्मपीठ म्हणून ओळख असलेल्या पैठण येथे या लोकांचे हिंदू धर्मात घरवापसी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नाथ महाराजांचे वंशज रावसाहेब गोसावी यांच्या हस्ते छोटेखानी समारंभात त्यांचा सत्कार समारंभ पार पडला. दरम्यान ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर या लोकांना मूळ हिंदू धर्माची ओढ लागल्याने त्यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अशाच प्रकारे 5 जानेवारी रोजीदेखील आणखी 65 महिला व पुरुष पैठण येथील कार्यक्रमात हिंदू धर्मात येतील, असी माहिती ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी दिली.

इतर बातम्या-

महिलेच्या पोटात 35 वर्षापासून भ्रूण! 2 किलो वजनाचा स्टोन बेबी पाहून डॉक्टर्सही हैराण

अखेर आठवड्याची सुरवात दिलासादायक, सोयाबीनची आवकही वाढली अन् दरही….

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.