औरंगाबादः चोरी करणारे लोक खूप हुशार असतात, चोरी (Aurangabad police ) केलेल्या घरात कोणतीही महागडी वस्तू शिल्लक ठेवत नाहीत आणि हो… आपली ओळख पटेल, असा कोणताही पुरावा मागे ठेवत नाहीत, असं ऐकलेलं आहे. मात्र औरंगाबादमध्ये (City Crime) काल झालेल्या चोरीत चोराने भलतीच चूक केली. ज्या घराचं कुलूप तोडून चोरानं येथील लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला, तिथं स्वतःचा मोबाइलच विसरला. चोराच्या या मूर्खपणाची (Aurangabad Thief) चर्चा सध्या शहरात सुरु आहे.
शहरातील बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री पाच ते सहा घरे चोरांनी फोडली. यातील एका घराचे कुलूप तोडून चोराने त्याचा मोबाइल घरात ठेवला आणि चोरी करून जाताना चुकून दुसराच मोबाइल सोबत नेला. घरफोडीची घटना कळताच बेगमपुरा पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी एक मोबाइल नव्याने घरात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.
औरंगाबाद शहरात दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची विविध कॉलनीतील घरे चोरट्यांनी फोडली. दिवाळीनिमित्त पोलिसांनी ‘आपला शेजारी, खरा पहारेकरी’ हे अभियान राबवले. तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्तीत वाढ करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र शहरात पोलिसांची ही विशेष मोहीम सपशेल फेल गेल्याचे चित्र दिसून आले. शहरात मागील आठवडाभरातच 17 ठिकाणी घरफोड्या झाल्या. तर एन-3 मधील वानखेडे नगरात एकाच रात्री 5 घरे फोडण्यात आली. यामुळे पोलिसांनी शहराची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याची चर्चा शहरात सुरु आहे. त्यासोबतच चोराने स्वतःचा मोबाइल चोरी केलेल्या घरातच विसरल्यामुळे चोराच्या या मूर्खपणाचीही चर्चा शहरात सुरु आहे.
इतर बातम्या-
Poonam Pandey | कुरबुरी सुरुच, मारहाणीनंतर पूनम पांडे रुग्णालयात, नवऱ्याला अटक https://t.co/NfTQJ0HEjw #PoonamPandey | #SamBombay | #Mumbai | #Crime
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 9, 2021