Women Rescued : औरंगाबादमध्ये मोटरमनच्या सतर्कतेमुळे महिला बचावली, रेल्वेरुळात पाय अडकल्यामुळे पडली रुळावर

औरंगाबाद शहरातील चिखलठाना रेल्वे रूळ परिसरात एक महिला रेल्वे रुळ ओलांडत होती. रेल्वे रुळ ओलांडत असताना महिलेचा पाय रुळात अडकला. त्यामुळे महिलेला पुढे जाता येईना आणि ती रुळावर पडली. याच दरम्यान त्याच रुळावर एक रेल्वेगाडी येत होती. या रेल्वेगाडीचे मोटरमन अमितसिंग आणि धीरज थोरात यांनी महिला रेल्वे रुळावर पडल्याचे पाहिले.

Women Rescued : औरंगाबादमध्ये मोटरमनच्या सतर्कतेमुळे महिला बचावली, रेल्वेरुळात पाय अडकल्यामुळे पडली रुळावर
औरंगाबादमध्ये मोटरमनच्या सतर्कतेमुळे महिला बचावलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 5:59 PM

औरंगाबाद : रेल्वे रुळात पाय अडकल्यामुळे रुळावर पडलेल्या महिलेचे रेल्वे मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे प्राण वाचले (Rescued) आहेत. प्रतितास 100 किमीचा वेग असलेली रेल्वे (Railway) अवघ्या 20 सेकंदात थांबवून या महिलेला सुखरुप (Safe) रेल्वे रुळावर बाहेर काढण्यात आले. औरंगाबाद शहरातील चिखलठाना रेल्वे रूळ परिसरात ही चित्त थरारक घटना घडली आहे. अमितसिंग आणि धीरज थोरात अशी मोटरमनची नावे आहेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून मोटरमनने प्रसंगावधान दाखवल्याने महिला मरणाच्या दारातून वाचली.

रेल्वे रुळ ओलांडताना महिलेचा पाय रुळात अडकला

औरंगाबाद शहरातील चिखलठाना रेल्वे रूळ परिसरात एक महिला रेल्वे रुळ ओलांडत होती. रेल्वे रुळ ओलांडत असताना महिलेचा पाय रुळात अडकला. त्यामुळे महिलेला पुढे जाता येईना आणि ती रुळावर पडली. याच दरम्यान त्याच रुळावर एक रेल्वेगाडी येत होती. या रेल्वेगाडीचे मोटरमन अमितसिंग आणि धीरज थोरात यांनी महिला रेल्वे रुळावर पडल्याचे पाहिले. यानंतर क्षणाचाही विलंब न करता प्रतितास 100 किमीचा वेग असलेली रेल्वे मोटरमनने अवघ्या 20 सेकंदात थांबवली. रेल्वे चालकाने तातडीने रेल्वे थांबवल्याने महिलेचे प्राण वाचले. रेल्वे खाली अडकलेल्या महिलेला रेल्वे चालकाने बाहेर काढले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल.

कसारा घाटात भीषण अपघात, मात्र चालक सुखरुप बचावला

नवीन कसारा घाटात रविवारी सकाळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटनेरचा भीषण अपघात झाला. एवढा भीषण अपघात होऊनही कंटनेरमधील चालक आणि क्लिनर बचावले आहेत. क्लिनरला किरकोळ मार लागला असून चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच कसारा घाट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन दलाला याबाबत माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन दलाने 40 मिनिटे रेस्क्यू ऑपरेशन करत कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाची सुटका केली. सध्या चालकावर इगतपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (In Aurangabad a woman was rescued by a motorman while coming under a train)

हे सुद्धा वाचा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.