औरंगाबादमध्ये भाजपचे आंदोलन, नांदेड-मालेगाव-अमरावती दंगलीचा निषेध, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी

नांदेड, मालेगाव, अमरावतीत झालेल्या हिंसक कारवाईप्रकरणी जबाबदार संघटनेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज राज्यभरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. औरंगाबादमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केले.

औरंगाबादमध्ये भाजपचे आंदोलन, नांदेड-मालेगाव-अमरावती दंगलीचा निषेध, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी
औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपचं आंदोलन
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 1:43 PM

औरंगाबादः राज्यात घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ औरंगाबादमध्ये भाजप पक्षाच्या (BJP Agitation ) वतीने आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Aurangabad collector office)  भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. भाजपच्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नांदेड, मालेगाव, अमरावती दंगलींचा निषेध

ग्रामीण आणि शहरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने औरंगाबादमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. या मोर्चात आमदार अतुल सावे, आमदार हरीभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, बसवराज मंगरुळे, प्रवीण घुगे, इद्रीस मुलतानी आदींची उपस्थिती होती. 12 नोव्हेंबर रोजी राज्यभरात मुस्लिम संघटनांनी निदर्शने केली. त्यानंतर राज्यातील काही ठिकाणी या दिवशी हिंसक कारवाया घडून आल्या. त्याचे पडसाद अमरावतीसह अन्य काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी उमटले. मात्र विविध ठिकाणी पोलिसांनी केवळ भाजप कार्यकर्त्यांच अटक करत एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या दडपशाहीविरोधात जोरदार आंदोलन उघडणार असल्याचा इशारा भाजपने दिला होता. या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात भाजपच्या वतीने निषेधात्मक आंदोलन करण्यात येत आहे.

‘त्रिपुरातील कथित दंगलींचा निषेध करणाऱ्या संघटनेवर कारवाई करा’

त्रिपुरा येथील कथित दंगलींचा निषेध म्हणून महाराष्ट्रात हिंसक कारवाया घडवणाऱ्या संघटनेवर आधी कारवाई करा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. त्रिपुरा येथील घटनेप्रकरणी 12 नोव्हेंबर रोजी रझा अकादमी या संघटनेच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.

इतर बातम्या-

बीडच्या कैद्याचा कारनामा! कारागृहातून 5 देशांतील लोकांना कोट्यवधींचा गंडा, मोठे हवाला रॅकेट उघड होण्याची शक्यता!

गोड बोलून तरुणाला जाळ्यात अडकवलं, मागितली एक लाखाची खंडणी, औरंगाबादध्ये हनी ट्रॅपची केस!

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.