औरंगाबाद जिल्ह्यात 113 गावांना सौर मोटरपंपाद्वारे पाणीपुरवठा, 1245 गावात योजनांची पुनर्बांधणी

जिल्ह्यातील 1245 गावांतील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाचा डीपीआर प्रशासनाने तयार केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 113 गावांना सौर मोटरपंपाद्वारे पाणीपुरवठा, 1245 गावात  योजनांची पुनर्बांधणी
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 5:08 PM

औरंगाबादः जिल्ह्यातील (Aurangabad district) जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांनी पुनर्बांधणी केली जात आहे. याअंतर्गत 1 हजार 245 गावांत पाणीपुरवठा योजनांची आखणी होणार आहे. त्यातील 113 गावांमध्ये सोलार मोटरपंपांद्वारे (Solar motor pump) गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीमार्फत या गावांचे सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती जलजीवन मिशन प्रकल्प संचालक सुदर्शन तुपे (Sudarshan Tupe) यांनी दिली.

पाणीपुरवठा योजनांचा आढावा

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने नुकताच या योजनांच्या पुनर्बांधणीसाठी जिल्ह्यातील गावांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. त्यापैकी 1245 गावांतील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाचा डीपीआर प्रशासनाने तयार केला आहे.

कायमस्वरुपी जलस्रोतचा शोध आवश्यक

जिल्ह्यातील अनेक गावांत सार्वजनिक पाणीपुरवठा योजना असूनही उन्हाळ्यात गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी कोरड्या पडतात. यामुळे पाणीपुरवठा योजना असूनही नागरिकांच्या नळाला पाणी येत नाही. यावर उपाय म्हणून कायमस्वरुपी जलस्रोताचा शोध घेऊन योजना राबवा, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिल्या.

113 गावांना सोलार पंपाद्वारे पाणीपुरवठा

दरम्यान, जिल्ह्यातील 113 गावांमध्ये वीज बिल थकल्यामुळे महावितरणणे शेकडो पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला. याचा फटका गावकऱ्यांना बसतो. वीजबिल भरणा केल्याशिवाय महावितरण जोडणी करीत नाही, म्हणून जिल्ह्यातील 113 गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना सोलार पंपाद्वारे राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याअंतर्गत या गावांना सोलर पंपाचा पुरवठा केला जाणार आहे.

गावांचे अ,ब,क,ड गटात वर्गीकरण

जलजीवन मिशन अंतर्गत गावांचे अ,ब,क,ड असा गटांत विभाजन करण्यात आले आहे. सोलर पंप बसवण्याचे काम ड वर्गातील गावांत केले जाईल. तसेच क वर्गातील 409 गावांतील पाणीपुरवठा योजना खूप जुन्या झाल्या असून, मोडकळीस आल्या आहेत. या गावांत नव्याने पाणीपुरवठा योजना राबवाव्या लागतील अ वर्गातील 341 गावांतील पाणीपुरवठा योजनांतील विहिरीची खोली वाढवणे, वर्तुळाचा आकार वाढवणे, पंपिंग यंत्रणेची क्षमता वाढवणे आदी कामे केली जातील. ब वर्गवारीत असलेल्या 495 गावांतील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती केली जाईल.

इतर बातम्या-

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे सोलर पॅनल्स, इन्व्हर्टर आणि वीज महागणार

Toyota ची सूर्यकिरणांद्वारे चार्ज होणारी Electric Car सादर, जाणून घ्या खास फीचर्स आणि किंमत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.