सोनं लुटा सोनं… भावात काहीशी वाढ, वाचा औरंगाबादचे दर
शहरातील सराफ्यात आज 22 कॅरेट सोन्याचे भाव 47100 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 64500 रुपये एवढे नोंदले गेले.
औरंगाबाद: गेल्या काही दिवसांपासून मंदावलेल्या सोन्या-चांदीच्या दरांनी (Silver-Gold Price) आता वाढीच्या दिशेने प्रवास सुरु केलेला दिसून येत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात घसरणीची मालिका दिसून आली होती. मात्र आता सोने-चांदीच्या दरात काहीशी वाढ झालेली दिसून येत आहे. दरम्यान दसऱ्याच्या मुहूर्तावर औरंगाबादेतील सराफा बाजारात (Aurangabad-Sarafa Market) चांगलीच वर्दळ पहायला मिळत आहे.
औरंगाबादमधील सोन्या-चांदीचे भाव
औरंगाबाद शहरातील सराफा बाजारात दसऱ्याच्या मुहूर्तावर आज ग्राहकांची चांगलीच गर्दी झालेली दिसून आली. शहरातील सराफ्यात आज 22 कॅरेट सोन्याचे भाव 47100 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 64500 रुपये एवढे नोंदले गेले. कालच्या पेक्षा सोन्याच्या दरात वाढ झाली असून चांदीच्या दरातही काही अंशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
बाजारात आपट्याची सोन्या-चांदीची पानं
विजयदशमीच्या मुहूर्तावर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रातील काही घरांमध्ये जावयाला सोन्या-चांदीची पानं देण्याची प्रथा आहे. त्यानिमित्त औरंगाबादमधील सराफा बाजारात विविध आकारातील तसेच वजनानुसार सोने आणि चांदीची आपट्याची पानं विक्रीसाठी आली आहेत. नवरात्रीदरम्यान जास्तीत जास्त शुद्ध सोनं विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. मात्र दसऱ्याच्या दोन दिवस आधी ही खास आपट्याची पानं खरेदी करणारा ग्राहक वर्गही दिसतोच.
दिवाळीपर्यंत सोनं 49 हजारांवर
सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ शक्य आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत पोहोचू शकतो. पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव सध्याच्या पातळीपासून 10 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात, मार्च 2022 च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा बंद भाव 60,967 रुपये प्रति किलो होता.
इतर बातम्या-
Gold Rate Today : सोन्याचे भाव वाढले, चांदी स्वस्त; जाणून घ्या किमती
सोन्याच्या प्रत्येक दागिन्यांना एक युनिक आयडी मिळणार, सरकारची जबरदस्त योजना