औरंगाबाद मनपा निवडणूक: 126 पैकी 63 वॉर्ड महिला नगरसेवकांसाठी राखीव

लोकसंख्या वाढीमुळे नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2011 ची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 होती. त्याआधारे नगरसेवकांची संख्या 115 वरून 126 करण्यात आली आहे. यापैकी निम्मे वॉर्ड महिलांसाठी राखीव असतील.

औरंगाबाद मनपा निवडणूक: 126 पैकी 63 वॉर्ड महिला नगरसेवकांसाठी राखीव
मविआने खुल्या प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणाच्या जागा मागासवर्गीय उमेदवारांना विकल्या
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 12:37 PM

औरंगाबादः आगामी महापालिका निवडणुकीसाठी (Aurangabad corporation election ) राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election commission ) सूचनांनुसार औरंगाबाद महानगरपालिकेने प्रशासकीय स्तरावर 42 प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. शहरात 9 हजार 746 लोकसंख्येचा एक वॉर्ड राहणार आहे. एकूण 126 वॉर्डांपैकी 63 वॉर्ड महिलांसाठी (Reservation for women) राखीव राहणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयात आयोगाचे शपथपत्र सादर

औरंगाबादमधील महानगरपालिकेच्या वॉर्ड रचनेवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. परंतु निवडणूक प्रक्रिया जैसे ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. हे आदेश उठवण्यासाठी आता राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले असल्याची माहिती उपायक्त संतोष टेंगळे यांनी दिली आहे.

18 नोव्हेंबरपर्यंत कच्चा आराखडा सादर करण्याची मुदत

राज्य निवडणूक आयोगाने 18 नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसंख्या वाढीमुळे नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2011 ची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 होती. त्याआधारे नगरसेवकांची संख्या 115 वरून 126 करण्यात आली आहे. यापैकी निम्मे वॉर्ड महिलांसाठी राखीव असतील. प्रभागांची संख्या 42 असेल. निवडणुकीसाठी तीन वॉर्डांचा एक प्रभाग केला जाईल. 26 हजार 315 ते 32 हजार 161 लोकसंख्येचा एक प्रभाग असेल. तर एका वॉर्डाची लोकसंख्या 9,746 असेल. 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 एवढी होती. मात्र या मतदारांची संख्या 9 लाख 39 हजार 458 एवढी आहे. मात्र यंदा मतदारांच्या संख्येत 10 टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात लोकसंख्येच्या तुलनेत 60 ते 70 टक्के मतदार असतील.

इतर बातम्या-

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच, मराठवाड्यात 120 जणांचे निलंबन, नादेंडमध्ये सर्वाधिक 58 जणांवर कारवाई

तुला पैसे प्रिय का प्रेयसी? त्याच्या ओठांना लावला विषाचा प्याला, भर दिवाळीत प्रियकर बेशुद्ध, काय घडलं जालन्यात?

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.